जळगाव नेऊर : कांद्यापाठोपाठ मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्या जाणाऱ्या टोमॅटो पिकावर जीवाणूजन्य करपा रोगाने आक्रमण केल्याने, उत्पादनाच्या उंबरठ्यावर हजारो हेक्टरवरील टोमॅटो पीक संकटात सापडले असून, शेतकरी हवालदिल झाला आहे.
येवला तालुक्यासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकाची लागवड केली असून, साधारणपणे ऑगस्ट महिन्याच्या मध्यापासून येथील टोमॅटोची राज्यात व राज्याबाहेर विक्री सुरू होते, पण गेली दहा-बारा दिवसांपासून कधी रिमझिम पाऊस, तर कधी जोराचा पाऊस, तर कधी उष्ण, दमट वातावरणाने टोमॅटो पिकावर जीवाणूजन्य करपा रोगाने आक्रमण केल्याने टोमॅटो पीक संकटात सापडले आहे. पाने, फांद्या, फळांवर काळे ठिपके पडल्याने फेकून देण्याची वेळ आली आली असल्याने, शेतकऱ्यांची वाट बिकट झाली आहे. मोठ्या प्रमाणात टोमॅटो पिकावर जीवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पाने करपत असून, फळांवर काळे ठिपके पडले असून, तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा टोमॅटो पिकावरील खर्चात वाढ झाली असून, मोठ्या प्रमाणात औषधांचा खर्च वाढत आहे
---------------------
पिके करपली
जीवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव पानावर फांद्यांवर व फळांवर झाल्यामुळे प्रत खराब होत असते. दररोज पडणाऱ्या पावसाच्या सरीमुळे औषधेही वाया जात असून, मोठ्या प्रमाणात खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे, मोठ्या संकटातून वाचविलेले टोमॅटो पीक करपत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
-----------
क्षेत्र वाढले, खर्चात वाढ
येवला तालुक्यात या वर्षी टोमॅटो लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, त्या बरोबरच टोमॅटो पीक उभे करण्यासाठी लागणारे साहित्य तार, बांबू, मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन संच, मजुरी यामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने टोमॅटो पीक खर्चिक बनत चालले आहेत.
---------------
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मशागत करून, खते टाकून पेपर अंथरून दीड एकरावर टोमॅटो लागवड केली, पण गेली दहा-बारा दिवसांपासून दिवसापासून कधी रिमझिम पाऊस, कधी जोराचा पाऊस तर कधी, उष्ण, दमट वातावरण, यामुळे टोमॅटोवर जीवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडावर करपा येऊन, फळांवर काळे डाग पडल्याने, मोठ्या प्रमाणात औषधांच्या फवारण्या कराव्या लागत असल्याने, हजारो रुपये खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
- शांताराम मढवई, टोमॅटो उत्पादक
--------------
जळगाव नेऊर (२४ जळगाव नेऊर)
240721\24nsk_4_24072021_13.jpg
२४ जळगाव नेऊर