शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

येवला तालुका : पंचायत समितीत तीन गावे, एका वाडीचा टॅँकरसाठी प्रस्ताव डिसेंबरमध्येच पाणीटंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 11:51 PM

तालुक्याला डिसेंबरमध्येच पाणीटंचाईची तीव्रता जाणवू लागली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात पाणीपुरवठा करणाºया विहिरी आटल्या असून, पाणीटंचाईची झळ उत्तरपूर्व भागात बसायला सुरुवात झाली आहे.

येवला : तालुक्याला डिसेंबरमध्येच पाणीटंचाईची तीव्रता जाणवू लागली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात पाणीपुरवठा करणाºया विहिरी आटल्या असून, पाणीटंचाईची झळ उत्तरपूर्व भागात बसायला सुरुवात झाली आहे. विहिरीचे स्रोत आटल्याने व तळ उघडा पडू लागल्याने टँकरने पाणीपुरवठा करावा यासाठी तीन गावे आणि एक वाडीचा टँकर मागणीचा प्रस्ताव येवला पंचायत समितीकडे दाखल झाला आहे. पाणी टँकर अद्याप तालुक्यात सुरू नसला तरी गावोगावचे पाणीटंचाईचे ठराव यायला सुरुवात झाली आहे. यामुळे आगामी सहा महिन्यांत पाणीटंचाई तालुक्याला हैराण करणार असल्याचे चित्र आजच दिसत आहे. पंचायत समिती आणि तहसीलचा संयुक्त पाहणी दौरा मात्र अजून सुरू झालेला नाही. तालुक्यातील अहेरवाडी, खैरगव्हाण, कुसमाडी ही तीन गावे आणि गोपाळ वाडीचे (खैरगव्हाण) टॅँकर प्रस्ताव येवला पंचायत समितीकडे दाखल करण्यात आले आहे.असा होतो मागणीचा प्रस्ताव मंजूरपाणीटंचाईच्या गावात प्रथम ग्रामपंचायतीत महिला कमिटी टंचाईचा ठराव करून पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल करते. गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांची संयुक्त समिती संबंधित गावाला भेट देऊन पाहणी करते. त्यानंतर आवश्यकता असल्यास सदरचा प्रस्ताव प्रांताधिकारी कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविला जातो. मंजुरी मिळाल्यानंतर गावाला टँकर सुरू होतो.पाणीटंचाई कृती आराखडागेल्या वर्षी सन २०१५-१६ मध्ये येवला तालुक्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. अंतिम टप्प्यात तब्बल ६३ गावे, ४४ वाड्यांना ३३ टँकर्सद्वारे दररोज ११६ खेपा करून पाणीपुरवठा करण्यात आला होता. २०१६-१७ मध्ये ४८२ मिलीमीटर एवढा पाऊस झाल्याने तुलनेने पाणीटंचाईची तीव्रता काहीशी कमी झाली होती; मात्र तालुका टँकरमुक्त होण्यासाठी नवीन पाणीस्रोत व साठवण करण्याची गरज नक्कीच कायम राहिली आहे. यंदा पालखेडचे आवर्तन फिरल्याने शेतीला पुरेसे पाणी मिळाले नसले तरी अनेक गावांची पिण्याच्या पाण्याची टंचाई काहीकाळ लांबणीवर पडली होती. यंदा मात्र डिसेंबरमध्येच पाणीटंचाई भासू लागली आहे. टॅँकरचे प्रस्ताव दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.पाणीटंचाई आणि कृती आराखडापंचायत समितीच्या वतीने पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार करून दरवर्षी मंजूर केला जातो. या आराखड्यात उपाययोजना करताना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे हीच उपाययोजना प्राधान्याने विचारात घेतली जाते; मात्र पाणीपुरवठा निवारण करण्यासाठी विहीर, विंधन विहीर घेणे व लगतचे जलस्रोत बळकट करण्याचे उपाय मात्र केवळ कागदावरच राहतात, तर प्रत्यक्षात किती उतरवले जातात हा संशोधनाचा विषय आहे. गेल्या वर्षी पाणीटंचाईच्या दुसºया टप्प्यात कृती आराखड्याच्या कागदावर जानेवारी २०१७ ते मार्च २०१७ या तीन महिन्यांत २१ गावे आणि २४ वाड्यांना टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागणार असल्याचे नियोजन होते; मात्र तालुक्यात ४८२ मिलीमीटर पाऊस झाल्याने केवळ बाळापूर या एका गावाचा टँकर प्रस्ताव आला होता. यंदा जानेवारी ते मार्च २०१८ या तीन महिन्यांच्या कालावधीत ३४ गावे व २३ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन प्रस्तावित आहे.