शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

येवला पालिका कर्मचारी वेतनापासून वंचित

By admin | Updated: May 20, 2014 00:12 IST

येवला : पालिका कर्मचार्‍यांचे एप्रिल महिन्याचे वेतन व निवृत्तीवेतन न मिळाल्याने पालिका कर्मचारी संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. १ जूनपर्यंत कर्मचार्‍यांचे रखडलेले एप्रिल व मे महिन्याचे वेतन व निवृत्ती वेतन द्यावेत, अन्यथा अत्यावश्यक सेवेसह काम बंद आंदोलनाचा इशारा नगर परिषद कर्मचारी संघटनेचे प्रदेश चिटणीस शशिकांत मोरे यांनी दिला आहे.

येवला : पालिका कर्मचार्‍यांचे एप्रिल महिन्याचे वेतन व निवृत्तीवेतन न मिळाल्याने पालिका कर्मचारी संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. १ जूनपर्यंत कर्मचार्‍यांचे रखडलेले एप्रिल व मे महिन्याचे वेतन व निवृत्ती वेतन द्यावेत, अन्यथा अत्यावश्यक सेवेसह काम बंद आंदोलनाचा इशारा नगर परिषद कर्मचारी संघटनेचे प्रदेश चिटणीस शशिकांत मोरे यांनी दिला आहे.शासनाकडून जिल्हाधिकार्‍यांमार्फत पालिका कर्मचार्‍यांना सहायक अनुदानाची रक्कम मिळाली नसल्याने वेतन, निवृत्तीवेतन रखडले आहे. या कामी संघटना काही दिवसांपासून शासनाच्या वित्त विभागाच्या संपर्कात आहे. अनुदान प्राप्त होण्यास आणखी तीन आठवडे लागण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकांच्या कामांमुळे अनुदान प्राप्तीला उशीर होत असल्याचे जबाबदार अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. असे असले तरी अन्य शासकीय विभागातील कर्मचार्‍यांचे वेतन मात्र नियमित होत आहे. केवळ पालिका कर्मचार्‍यांच्या बाबतीतच दुजाभाव का? असा सवाल संघटनेचे प्रशांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.पालिका कर्मचारी, साफसफाई, पाणीपुरवठा व अन्य नागरी सुविधांसह लोकसभा निवडणुकीचीदेखील कामे प्रामाणिकपणे पार पाडतात. तरीही वेतनात दिरंगाई होऊन कर्मचार्‍यांची अडचण केली जाते. यामुळेच संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)