शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

येवला औद्योगीक वसाहतीचे पदाधिकारी अल्पमतात;निवडणूक घेण्याची मागणी

By admin | Updated: March 24, 2017 23:49 IST

येवला : येवला औद्योगीक सहकारी वसाहत मर्या. या संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष अल्पमतात आल्याने त्यांचे कामकाज थांविण्यात यावे,अशी मागणी संचालकांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

येवला : येवला औद्योगीक सहकारी वसाहत मर्या. अंगणगाव या संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष अल्पमतात आल्याने त्यांचे कामकाज थांविण्यात यावे,अशी मागणी सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके यांच्यासह सहनिबंधक सहकारी संस्था नासिक यांचेकडे संस्थेच्या संचालकांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. येवला औद्योगीक सहकारी वसाहत मर्या. अंगणगाव या संस्थेत १३संचालक निर्वाचित असून संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या मनमानी, बेकायदेशीर व नियमबाह्य कारभारामुळे आम्ही संस्थेच्या बहुमतातील सर्व संचालकांनी त्यांच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी संचालक मंडळ सभेवर बहिष्कार टाकून सभेत जाण्याचे नाकारले आहे. संस्थेच्या १३ संचालकांपैकी निम्म्यापेक्षा अधिक संचालकांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या निर्णयाबाबत , गैरकारभाराबाबत असहमती दर्शवली असल्याने अध्यक्ष, उपाध्यक्ष हे अल्पमतात आले आहेत. त्यांनी आतापर्यंत केलेल्या कारभारात महत्वाच्या विषयाबाबत संचालक मंडळाला विश्वासात न घेता प्रत्येक मासिक सभा अजेंड्यात आलेल्या पत्रावर विचार करणे, अशा स्वरु पाचा संदिग्ध विषय टाकून महत्वाच्या बाबींबाबत निर्णय घेवून संचालक मंडळाच्या स्वाक्षऱ्या करु न घेतल्याचे या निवेदनात नमूद केले आहे.अध्यक्षांचे हे वर्तन शासनाचा, न्यायालयाचा अवमान करणारे आण िसंस्थेच्या हिताच्या विरु द्ध आहे. संस्थेच्या सर्व सभासदांची के. वाय. सी. माहिती संस्थेच्या दफ्तरी दाखल करण्याची सुचना शासनाने केलेली आहे. ही बाब संचालक मंडळातील संचालकांनी वारंवार निदर्शनास आणून देवून देखील सदर विषयाकडे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी दुर्लक्ष करु न सदर बाब इतिवृत्तात घेण्याचे टाळले. संस्थेने पायाभूत सुविधेकरीता २५ टक्के सहभाग रक्कम महाराष्ट्र औद्योगीक विकास महामंडळाकडे जमा केली आहे. मात्र, सदर पायाभूत सुविधा काम करणे पूर्वी महाराष्ट्र औद्योगीक विकास महामंडळाने अतिक्र मण काढणेबाबत लेखी पत्र दिलेले आहे. यावर अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी अतिक्र मण काढणे बाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. परिणामी सदरचे काम सहभाग रक्कम भरु नही रखडलेले आहे. यामुळे संस्थेच्या मुदत ठेव रक्कमेचे व्याज बुडत असून संस्थेचे आर्थिक नुकसान होत आहे. याकामी अध्यक्ष, उपाध्यक्ष अकार्यक्षम ठरले आहेत.  माहे सप्टेंबर २०१६ मध्ये घेतलेल्या सर्वसाधार ण सभेचा अजेंडा संस्थेच्या कोणत्याही सभासदांना आण िप्रामुख्याने प्लॉटधारक सभासद व संचालकांना दिला नाही. सहकारी संस्थेच्या नियमानुसार सर्वसाधारण सभेचा अजेंडा देणे व अजेंडा मिळाल्याच्या खात्री करिता दफ्तरी पोचपावती ठेवणे आवश्यक असतांना याबाबत अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी हेतूपूर्वक नियमभंग केलेला आहे. दरमहा होणार्?या खर्चाबाबतची मंजूरी मिळणे बाबतचा विषय मिहना पूर्ण होण्याच्या आधीच्या तारखेला संचालक मंडळ बैठकीत घेतला जातो आण िखर्चाला मंजूरी घेतली जाते. पोलिस अधिक्षकांडे गेलेल्या वसाहतीच्या जागेबाबत प्रशासक मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती अर्ज केला होता. याबाबत जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या निर्णयावर संस्थेच्या हिताकरिता पुढील महसूली कार्यवाही होणे करिता अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. परिणामी कारखाने बंद पडण्याची वेळ आली आहे. सदर वस्तुस्थिती लक्षात घेता अल्पमतात आलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना आर्थिक व्यवहार करणेबाबत प्रतिबंध करु न नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीबाबत कार्यवाही करावी तसेच अल्पमतातील अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना यापुढे मासिक सभा घेण्यास प्रतिबंध करावा,अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर संस्थेचे संचालक विक्र म गायकवाड, चारु शिला काबरा,योगेंद्र वाघ,सुनील भावसार, सुहास अलगट,नविनचंद्र परदेशी, विष्णु खैरणार,सुकृत पाटील,सुचित्रा पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.(वार्ताहर )