शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पिवळी पिके हे दाहक वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 00:10 IST

नांदगाव : इतरत्र जास्त पावसाने पिके पिवळी पडलेली दिसत असली तरी नांदगाव तालुक्यात पाण्याअभावी पिवळी पडलेली पिके हे दाहक वास्तव आहे. दुष्काळाला सामोरे जात असलेल्या जनतेविषयी अधिकाऱ्यांनी सजग असायला हवे, असे आवाहन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केले.

ठळक मुद्देहरिश्चंद्र चव्हाण : नांदगावला झालेली आढावा बैठक वादळी

 

 

नांदगाव : इतरत्र जास्त पावसाने पिके पिवळी पडलेली दिसत असली तरी नांदगाव तालुक्यात पाण्याअभावी पिवळी पडलेली पिके हे दाहक वास्तव आहे. दुष्काळाला सामोरे जात असलेल्या जनतेविषयी अधिकाऱ्यांनी सजग असायला हवे, असे आवाहन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केले.येथील पंचायत समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. माजी आमदार संजय पवार,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, प्रांताधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार भारती सागरे, गटविकास अधिकारी जगनराव सूर्यवंशी, मुख्याधिकारी श्रिया देवचके, जिल्हा परिषद सदस्य आशाबाई जगताप, भाजपाचे तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड, पंचायत समिती सदस्य मधुबाला खिरडकर, श्रावण गोºहे आदी व्यासपीठावर होते.आढावा बैठकीच्या निमित्ताने समस्याग्रस्त लोकांच्या समस्यांना वाचा फुटली. वीज वितरण कंपनीच्या वाढीव बिलांच्या रकमा, ४२ खेडी व ५६ खेडी पाणीपुरवठा योजनांमधील त्रुटी अशा अनेक समस्यांचा पाढा जनतेने खासदारांसमोर वाचला. जनतेतील प्रक्षोभ लक्षात घेता खासदार चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १० सप्टेंबरला होणाºया बैठकीत नांदगाव तालुक्यातील परिस्थितीकडे लक्ष वाढणार असल्याचे सांगितले.सामान्यांच्या प्रश्नांविषयी उदासीन राहून बैठकांना अनुपस्थित राहणाºया अधिकाºयांचा अहवाल जिल्हाधिकाºयांना सादर करण्याची सूचना चव्हाण यांनी तहसीलदार भारती सागरे यांना केली. अधिकारी काम करीत नसल्याने निर्माण होणाºया अडचणींचा मुद्दा माजी आमदार संजय पवार यांनी मांडून खासदारांनी त्यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली.मुख्याधिकारी श्रिया देवचके यांनी पालिकेने पाणीपट्टीचे पैसे भरल्यावरदेखील जिल्हा परिषदेकडून पाण्याचे आवर्तन उशिरा मिळते, ते तीन दिवसांनी मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. या बैठकीत वीज वितरण विभागाच्या तक्रारींचा पाऊस पडला. त्यावर वीज वितरण विभागाच्या अधिकाºयांची भंबेरी उडाली. टँकर भरून द्याकेवळ ३८ टक्के पाऊस होऊनही ४० टक्के पिके चांगली आहेत. या कृषी अधिकाºयांच्या माहितीला नागरिकांनी जोरदार आक्षेप घेतला. तुरळक पाऊस झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याचे टँकर बंद करण्यात आले व ज्या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जातो तो शुद्ध नसतो. त्यासाठी ५६ खेडी योजनेतून टँकर भरून देण्याची मागणी करण्यात आली.