शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

येवल्याचा फेटा जाणार सातासमुद्रापार.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 18:49 IST

येवला : येवल्यातील फेटा कलावंत श्रीकांत खंदारे यांच्या बकेट लिस्ट मधील आणखी एक स्वप्न पूर्ण झाले असून मलेशियातील एका कार्यक्र मात तेथील विविधस्तरातील मान्यवरांच्या डोक्यावर येवल्याचा फेटा मिरवणार आहे.

ठळक मुद्देमलेशियात मान्यवरांच्या डोक्यावर मिरवणार

येवला : येवल्यातील फेटा कलावंत श्रीकांत खंदारे यांच्या बकेट लिस्ट मधील आणखी एक स्वप्न पूर्ण झाले असून मलेशियातील एका कार्यक्र मात तेथील विविधस्तरातील मान्यवरांच्या डोक्यावर येवल्याचा फेटा मिरवणार आहे.मलेशिया येथे ७ ते १३ मार्च दरम्यान कोकमठाण येथील अध्यात्मिक गुरु जंगलीदास महाराज यांच्या सत्संग सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्र मात येवल्याचा फेटा मलेशियाच्या विविध मान्यवरांच्या डोक्यावर श्रीकांत खंदारे यांच्या हस्ते बांधण्यात येणार असल्याने खंदारे यांचे एक मोठे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.श्रीकांत खंदारे याने येवल्यातील अस्सल मराठमोळ्या फेट्याला थेट दिल्ली मुंबईपर्यंत ओळख करून दिली आहे. सहा महिन्यापूर्वीच त्याने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांनाही फेटा बांधला होता. तसेच क्रि केटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यासह अनेक सिनेकलाकार व क्रि केटपटूंना फेटा बांधलेल्या श्रीकांतने येवल्याचा फेटा सातासमुद्रापार नेण्याचे एक मनोमन स्वप्न बाळगले होते. अखेर या स्वप्नांच्या मागे धावता धावता ते प्रत्यक्षात साकारले गेले आहे. महाराष्ट्राची शान असलेला फेटा बांधण्याची कलेच्या जोरावर आजपर्यंत अनेकाना फेटा बांधून आपली स्वप्नपूर्ती प्रत्यक्षात उतरवणारा श्रीकांत याने अध्यात्मिक गुरु परमपूज्य जंगलीदास महाराज, परमानंद महाराज यांच्यासह मलेशियात एका सत्संग सोहळ्यास जाण्याचा मान मिळाला असून त्यानिमित्ताने मलेशिया येथे या कार्यक्र मात उपस्थित मान्यवरांना श्रीकांत खंदारे यांच्या हस्ते फेटा बांधण्यात येणार असल्याने येवल्याचा फेटा सातासमुद्रापार नेण्याचे श्रीकांतचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे. (फोटो ०५ खंदारे)