शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

यंदा फक्त १ लाख ६९ हजार मूर्तींचे दान लक्षणिय घट: पर्यावरण जागृतीमुळे संकलन घटल्याचा मनपाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 15:51 IST

नाशिक- नाशिकमध्ये पर्यावरणस्नेही गणेशोत्सवांतर्गत गत वेळी २ लाख ३९ हजार गणेश मूर्तींचे दान स्विकारणाºया महापालिकेला यंदा फक्त १ लाख ३९ हजार मुर्तींचे दान मिळाले आहे. तथापि, नागरीकांमध्ये पर्यावरण विषयक जागृती झाल्याने या वर्षी मोठ्या प्रमाणात शाडू मातीच्या मूर्ती बसविण्यात आल्या या व अन्य मूर्तींची घरोघरी तसेच कृत्रिम तलावात निर्गत केल्याने ...

नाशिक- नाशिकमध्ये पर्यावरणस्नेही गणेशोत्सवांतर्गत गत वेळी २ लाख ३९ हजार गणेश मूर्तींचे दान स्विकारणाºया महापालिकेला यंदा फक्त १ लाख ३९ हजार मुर्तींचे दान मिळाले आहे. तथापि, नागरीकांमध्ये पर्यावरण विषयक जागृती झाल्याने या वर्षी मोठ्या प्रमाणात शाडू मातीच्या मूर्ती बसविण्यात आल्या या व अन्य मूर्तींची घरोघरी तसेच कृत्रिम तलावात निर्गत केल्याने संख्या घटली असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.नाशिक मध्ये १९९७ मध्ये महाराष्टÑ अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या वतीने विसर्जित मूर्तींचे दान प्रायोगिक तत्वावर स्विकारण्यास सुरूवात केली. पुढे गोदावरी नदीसह अन्य नद्यांचे प्रदुषण टाळण्यासाठी महापालिका त्यात सहभागी झाली. यानंतर अन्य संस्थाही सहभागी झाल्याने सातत्याने मूर्ती आणि निर्माल्य संकलनात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी २ लाख ३९ हजार मूर्तींचे संकलन करण्यात आले होते. त्यामुळे यंदा त्यापेक्षा अधिक संकलन होईल आणि मूर्ती संकलनाचा विक्रम प्रस्थापित होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. महापालिकेच्या बरोबरच विविध सेवाभावी संस्थांनी देखील यासंदर्भात आवाहन तर केलेच शिवाय मूर्ती विसर्जन स्थळांच्या ठिकाणी तसे मूर्ती स्विकृती केंद्रे उभारली होती. महापालिकेने २६ नैसर्गिक विसर्जन केंद्राच्या ठिकाणी मूर्तीदान स्विकारण्याची व्यवस्था केली होती. त्याच बरोबर २८ ठिकाणी कृत्रिम कुंडे तयार केली होती. नागरीकांच्या इच्छेनुसार कृत्रिम कुंडात विसर्जन करण्याची अथवा मूर्ती दानाची सोय करण्यात आली होती. प्रत्येक ठिकाणी महापालिकेचे दहा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. शिवाय, स्वंयसेवी संस्थांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. मात्र प्रत्यक्षात सहा विभाग मिळून १ लाख ६९ हजार ९५७ मूर्ती संकलीत करण्यात आल्या आहेत. मूर्ती संकलन घटण्यामागे महापालिकेने विविध कारणे दिली असून यंदा नागरीक पर्यावरण स्नेही झाल्यानेच शाडु मातीच्या मूर्तींचा वापर अधिक झाला, तसेच नागरीकांनी नदीपात्राशिवाय घरच्या घरी विसर्जन केले असा दावा करण्यात आला आहे. याशिवाय निर्माल्य संकलनातही घट झाली आहे. यंदा १३१.६ टन निर्माल्य संकलीत करण्यात आले आहे. गेल्या वर्षी १६९ टन निर्माल्य संकलीत करण्यात आले होते.