शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

यंदा मान्सून जूनअखेर होणार सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 00:42 IST

नाशिक : सूर्यावरील सौर धुमारे व चुंबकीय वादळांमुळे त्याचा परिणाम भारतीय मान्सूनवर होत असून, कमी सौर डागांमुळे दुष्काळी स्थिती ओढवली आहे. यंदा मान्सून उशिरा म्हणजे जूनअखेर सक्रिय होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी वर्तविली आहे.

ठळक मुद्दे हवामान तज्ज्ञांची माहिती : कमी सौर डागांमुळे दुष्काळ

नाशिक : सूर्यावरील सौर धुमारे व चुंबकीय वादळांमुळे त्याचा परिणाम भारतीय मान्सूनवर होत असून, कमी सौर डागांमुळे दुष्काळी स्थिती ओढवली आहे. यंदा मान्सून उशिरा म्हणजे जूनअखेर सक्रिय होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी वर्तविली आहे.महाराष्टÑात दुष्काळाचा दाह अधिक तीव्र होताना दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामानाचे अभ्यासक किरणकुमार जोहरे यांनी म्हटले आहे, २०१८ या वर्षाप्रमाणेच २०१९ आणि २०२० या वर्षात कमी सौर धुमारे व कमी चुंबकीय वादळे होण्याची माहिती उपलब्ध होत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम पुढील दोन वर्षे मान्सूनवर होण्याची शक्यता आहे. सूर्याकडून आलेली ऊर्जा केवळ उष्णतेच्या स्वरूपातच नव्हे तर विद्युतचुंबकीय क्षेत्रातदेखील बदल घडवून आणते. जितके सौर डाग जास्त, तितकी सौर वादळे जास्त. परिणामी, सूर्याकडून पृथ्वीकडे येणारी ऊर्जा जास्त आहे. बेल्जियमच्या सोलार इन्फ्ल्युअन्सेस डाटा अ‍ॅनालिसिस सेंटर (सीआयडीसी) या संस्थेच्या डाटाचे विश्लेषण करताना अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.यामुळे कमी सौर वादळाचे धुमारे (फ्लेम) निघाल्याची माहिती मिळते. नजीकच्या काळात हे कमी सौर धुमारे व कमी चुंबकीय वादळे होण्याची शक्यताही जोहरे यांनी वर्तविली आहे. सौर वादळांचा विचार केला तर भारतीय नैऋत्य हा मान्सून हाकमजोर होण्याची दाट शक्यता दिसून येते. कारण भारतीय भूभाग व या भूभागाजवळील सागराच्या पृष्ठभागाचे तापमान यातील आवश्यक फरक कमी झाल्याने मान्सून उशिरा आणि कमजोर होऊ शकेल, असेही जोहरे यांनी म्हटले आहे.पाणीकपातीचा निर्णय आवश्यकयंदा पुन्हा एकदा कडक दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. हिमालयात यंदा झालेली जास्त बर्फवृष्टी हादेखील दुष्काळाचा स्पष्ट इशारा आहे. त्यामुळे आतापासूनच पाणी कपातीचा निर्णय घेणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास ती गंभीर चूक होऊ शकते. शासनाने त्यासाठी योग्य ते धोरण राबवून लोकहिताचे निर्णय घेतले पाहिजेत. मध्य भारतातही दुष्काळाची स्थिती तीव्र होऊ शकते, असेही जोहरे यांनी म्हटले आहे.

हवामान तज्ज्ञांची माहिती : कमी सौर डागांमुळे दुष्काळयंदा मान्सून जूनअखेर होणार सक्रियनाशिक : सूर्यावरील सौर धुमारे व चुंबकीय वादळांमुळे त्याचा परिणाम भारतीय मान्सूनवर होत असून, कमी सौर डागांमुळे दुष्काळी स्थिती ओढवली आहे. यंदा मान्सून उशिरा म्हणजे जूनअखेर सक्रिय होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी वर्तविली आहे.महाराष्टÑात दुष्काळाचा दाह अधिक तीव्र होताना दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामानाचे अभ्यासक किरणकुमार जोहरे यांनी म्हटले आहे, २०१८ या वर्षाप्रमाणेच २०१९ आणि २०२० या वर्षात कमी सौर धुमारे व कमी चुंबकीय वादळे होण्याची माहिती उपलब्ध होत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम पुढील दोन वर्षे मान्सूनवर होण्याची शक्यता आहे. सूर्याकडून आलेली ऊर्जा केवळ उष्णतेच्या स्वरूपातच नव्हे तर विद्युतचुंबकीय क्षेत्रातदेखील बदल घडवून आणते. जितके सौर डाग जास्त, तितकी सौर वादळे जास्त. परिणामी, सूर्याकडून पृथ्वीकडे येणारी ऊर्जा जास्त आहे. बेल्जियमच्या सोलार इन्फ्ल्युअन्सेस डाटा अ‍ॅनालिसिस सेंटर (सीआयडीसी) या संस्थेच्या डाटाचे विश्लेषण करताना अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.यामुळे कमी सौर वादळाचे धुमारे (फ्लेम) निघाल्याची माहिती मिळते. नजीकच्या काळात हे कमी सौर धुमारे व कमी चुंबकीय वादळे होण्याची शक्यताही जोहरे यांनी वर्तविली आहे. सौर वादळांचा विचार केला तर भारतीय नैऋत्य हा मान्सून हाकमजोर होण्याची दाट शक्यता दिसून येते. कारण भारतीय भूभाग व या भूभागाजवळील सागराच्या पृष्ठभागाचे तापमान यातील आवश्यक फरक कमी झाल्याने मान्सून उशिरा आणि कमजोर होऊ शकेल, असेही जोहरे यांनी म्हटले आहे.पाणीकपातीचा निर्णय आवश्यकयंदा पुन्हा एकदा कडक दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. हिमालयात यंदा झालेली जास्त बर्फवृष्टी हादेखील दुष्काळाचा स्पष्ट इशारा आहे. त्यामुळे आतापासूनच पाणी कपातीचा निर्णय घेणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास ती गंभीर चूक होऊ शकते. शासनाने त्यासाठी योग्य ते धोरण राबवून लोकहिताचे निर्णय घेतले पाहिजेत. मध्य भारतातही दुष्काळाची स्थिती तीव्र होऊ शकते, असेही जोहरे यांनी म्हटले आहे.