शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

यंदा दीडशे टक्के पाऊस; जुन्या रस्त्यांची धूळधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:07 IST

पावसाचे दिवस अधिक : पालिकेकडून रस्त्यांचे सर्वेक्षण सुरू नाशिक : शहरात पावसाची वार्षिक सरासरी असते सुमारे ७०० मि.मी. परंतु, यंदा चार महिन्यांत पाऊस पडला १०८४ मि.मी. सरासरी दीडशे टक्के पाऊस आणि त्यातही पावसाचे दिवस अधिक असल्याने त्याचा परिणाम शहरातील पाच ते दहा वर्षांपूर्वी तयार केलेल्या रस्त्यांवर झाला असून, ठिकठिकाणी खड्डे पडून धूळधाण झाली आहे. आता महापालिकेने अशा रस्त्यांची सर्वेक्षण मोहीम हाती घेतली असून, दिवाळीनंतर रस्त्यांच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.

पावसाचे दिवस अधिक : पालिकेकडून रस्त्यांचे सर्वेक्षण सुरू

नाशिक : शहरात पावसाची वार्षिक सरासरी असते सुमारे ७०० मि.मी. परंतु, यंदा चार महिन्यांत पाऊस पडला १०८४ मि.मी. सरासरी दीडशे टक्के पाऊस आणि त्यातही पावसाचे दिवस अधिक असल्याने त्याचा परिणाम शहरातील पाच ते दहा वर्षांपूर्वी तयार केलेल्या रस्त्यांवर झाला असून, ठिकठिकाणी खड्डे पडून धूळधाण झाली आहे. आता महापालिकेने अशा रस्त्यांची सर्वेक्षण मोहीम हाती घेतली असून, दिवाळीनंतर रस्त्यांच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.दरवर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची दुरवस्था होत आली आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर महापालिकेमार्फत लगोलग तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यांची डागडुजीही केली जाते. सर्वसाधारणपणे नाशिक शहरात पावसाळ्यात सुमारे ७०० मि.मी. पाऊस पडतो आणि गोदावरी नदीला फार तर दोन किंवा तीनदा पूर येतो. यंदा मात्र, १ जून ते २९ सप्टेंबर २०१७ या कालावधीत १०८४ मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. म्हणजेच सरासरी दीडशे ते पावणेदोनशे टक्के पाऊस झाला आहे. शिवाय, यंदा फार कमी दिवस पावसाने उघडीप दिली असून, गोदावरी नदीलाही यंदा सुमारे सहा ते सात वेळा पूर येऊन गेला आहे. पावसाचे दिवस अधिक असल्याने यंदा त्याचा सर्वाधिक फटका पाच ते दहा वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या रस्त्यांना बसल्याचा दावा महापालिकेचे शहर अभियंता उत्तम पवार यांनी केला आहे. अशा रस्त्यांचे प्रभागनिहाय सर्वेक्षण आता महापालिकेने सुरू केले आहे. या सर्वेक्षणात ज्याठिकाणी ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी, केबल टाकण्यासाठी अथवा पाणीपुरवठ्याची लाइन टाकण्यासाठी रस्ते खोदले असतील, त्यांचीही नोंद घेतली जाणार आहे.रस्ता दुरुस्ती ठेकेदारामार्फततीन वर्षांच्या आतील ज्या रस्त्यांची दुरवस्था झालेली असेल, त्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदाराचीच आहे. महापालिकेकडून संबंधित ठेकेदारांकडून सदर रस्त्यांची कामे करून घेतली जातील, असे शहर अभियंता उत्तम पवार यांनी सांगितले. पावसाळा संपल्यानंतर शहरातील रस्त्यांची कामे हाती घेतली जातील. सततच्या पावसामुळे यंदा खड्डे बुजविण्यात अडथळे आले.