शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

यळकोट यळकोट जय मल्हार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 01:58 IST

‘यळकोट यळकोट जय मल्हार, खंडेरावाचा यळकोट’ असा जयघोष करत चंपाषष्ठीनिमित्ताने गंगाघाटावरील पुरातन श्री खंडेराव महाराज मंदिरासह पंचवटीतील खंडोबा मंदिरात सोमवारी शेकडो भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.

पंचवटी : ‘यळकोट यळकोट जय मल्हार, खंडेरावाचा यळकोट’ असा जयघोष करत चंपाषष्ठीनिमित्ताने गंगाघाटावरील पुरातन श्री खंडेराव महाराज मंदिरासह पंचवटीतील खंडोबा मंदिरात सोमवारी शेकडो भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. चंपाषष्ठीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रात्री वाघ्या-मुरळीच्या उपस्थितीत जागरण गोंधळ कार्यक्रम झाला.हिरावाडीत (शक्तीनगर) शिवमल्हार मित्रमंडळातर्फे चंपाषष्ठीनिमित्त सायंकाळी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला. गेल्या बुधवारपासून खंडेराव षडरात्रोत्सवाला प्रारंभ करण्यात आला होता. षडरात्रोत्सव कुलधर्म-कुलाचार झाल्यावर समारोप करत सोमवारी सकाळी खंडेराव पूजन, अभिषेक, आरती करत उत्सवाला सुरुवात झाली. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध प्रतिपदा षष्ठी कालावधीत देवाचा नवरात्रोत्सव असतो. षष्ठीला चंपाषष्ठी असल्याने यात्रा भरते. सायंकाळी गणेश आंबेकर यांच्या हस्ते बारा गाड्या ओढण्यात आल्या. यावेळी अध्यक्ष उदय गांगुर्डे, दिगंबर मोगरे, मोहित भडांगे, पवन बागुल, नितीन अहिरे, शुभम पवार, सुनील भुतेकर, सागर नेन्हे, पद्माकर भोईर, गणेश लोणारे, कांतीभाई परमार, आशितोष चव्हाण आदींसह शिवमल्हार मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. अमृतधाम विडी कामगारनगर, शिवाजी चौकात श्रीमंत खंडेराव महाराज देवस्थानतर्फे चंपाषष्ठी उत्साहात साजरी करण्यात आली. चंपाषष्ठीनिमित्त धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमKhandoba Yatraखंडोबा यात्रा