शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

यांत्रिकी झाडू खरेदीचा प्रस्ताव बारगळला सफाई कामगारांचा विरोध : महापौर, आयुक्तांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 14:07 IST

महापौरांसह पदाधिकार्‍यांनी औरंगाबाद येथे यांत्रिकी झाडूची प्रात्यक्षिके बघितल्यानंतर सहाही विभागांत झाडू खरेदीची चर्चा सुरू झाली असतानाच त्याला सफाई कामगारांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

ठळक मुद्दे सफाई कामगारांच्या संघटनांनी महापौर आणि आयुक्त यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. रोजंदारीवर भरती करण्यासंबंधीचा महासभेचा प्रस्ताव शासनाने विखंडित केलेला आहे.सफाई कामगारांना गणवेश, गमबूट, रेनकोटचे वाटप करावे आदी मागण्याही मांडण्यात आल्या.महापौर रंजना भानसी यांनी सफाई कामगारांची भरती केल्यानंतरच यांत्रिकी झाडू बाबतचा विचार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले सुरक्षारक्षकांनी आयुक्तांच्या दालनाचा मुख्य दरवाजावरच कामगारांना रोखून धरले

नाशिक : महापौरांसह पदाधिकार्‍यांनी औरंगाबाद येथे यांत्रिकी झाडूची प्रात्यक्षिके बघितल्यानंतर सहाही विभागांत झाडू खरेदीची चर्चा सुरू झाली असतानाच त्याला सफाई कामगारांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. सफाई कामगारांच्या संघटनांनी महापौर आणि आयुक्त यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यानंतर, महापौर रंजना भानसी यांनी सफाई कामगारांच्या भरतीनंतरच यांत्रिकी झाडू खरेदीबाबत विचार करण्याची ग्वाही दिली. त्यामुळे, यांत्रिक झाडू खरेदीचा प्रस्ताव बारगळल्यातच जमा आहे. शहरात सफाई कामगारांची अपुरी संख्या आणि सफाई व्यवस्थेवर येणारा ताण लक्षात घेता महापौरांनी यांत्रिकी झाडू खरेदीबाबतचा विचार बोलून दाखविला होता. त्यानुसार, औरंगाबाद येथे कार्यरत यांत्रिकी झाडूची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी महापौरांसह पदाधिकारी दोन दिवसांपूर्वी जाऊन आले होते. सदर यांत्रिकी झाडूंची खरेदी सहाही विभागांत भाडेतत्त्वावर घेण्याची चर्चा सुरू झाली असतानाच महानगरपालिका सफाई कामगार संघर्ष समिती तसेच अखिल भारतीय श्री वाल्मीकी नवयुवक संघाने महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते व आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेऊन यांत्रिकी झाडू खरेदी करण्यास तीव्र विरोध दर्शविला. याशिवाय, सफाई कामगारांची रोजंदारीवर भरती करण्यासंबंधीचा महासभेचा प्रस्ताव शासनाने विखंडित केलेला आहे. त्यावर शासनाला तातडीने अभिवेदन पाठवावे, कामगारांची भरतीप्रक्रिया तातडीने राबवावी आदींसह सफाई कामगारांना गणवेश, गमबूट, रेनकोटचे वाटप करावे आदी मागण्याही मांडण्यात आल्या. त्यावर, महापौर रंजना भानसी यांनी सफाई कामगारांची भरती केल्यानंतरच यांत्रिकी झाडू बाबतचा विचार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले तर आयुक्तांनी अन्य मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचे मान्य केले. शिष्टमंडळात सुरेश दलोड, सुरेश मारू यांच्यासह अनिल बहोत, सतीश टाक, सोनू कागडा, पापू तसांबड आदींचा समावेश होता. इन्फो सुरक्षाव्यवस्था तैनात अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी आयुक्तांच्या भेटीत केलेल्या कारनाम्यामुळे आयुक्तांच्या दालनासमोरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.२८) सफाई कामगारांच्या संघटनांचे कार्यकर्ते कामगारांसह मोठ्या संख्येने आयुक्तांच्या दालनासमोर जमा झाले. त्यामुळे सुरक्षारक्षकांनी आयुक्तांच्या दालनाचा मुख्य दरवाजावरच कामगारांना रोखून धरले आणि निवडक प्रतिनिधींनाच आत प्रवेश दिला. तत्पूर्वी, सफाई कामगारांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर आपल्या मागण्यांप्रश्नी घोषणाबाजी केली.