मालेगाव : येथील कलेक्टरपट्टा भागातील ॠषिकेश व्यंकटेश कदम (१९) या बारावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. १७) सायंकाळी उघडकीस आली. त्याच्या कुटुंबीयांच्या त्यास तत्काळ सामान्य रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी छावणी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, तपास हवालदार बोरसे करीत आहेत. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
बारावीच्या विद्यार्थ्याची मालेगावी आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:15 IST