शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

‘समाजकल्याण’च्या झेरॉक्स मशीन सापडल्या वादात

By admin | Updated: June 19, 2014 00:58 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागांतर्गत‘समाजकल्याण’च्या झेरॉक्स मशीन सापडल्या वादात

नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागांतर्गत नुकत्याच खरेदी करण्यात आलेल्या झेरॉक्स मशीन वादात सापडल्या असून, समाजकल्याण समितीच्याच एका जिल्हा परिषद सदस्याने याबाबत उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांच्याकडे तक्रार करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.जिल्हा परिषदेच्या सेसमधून ठरावीक निधी समाजकल्याण, महिला व बालकल्याण, ग्रामीण पाणीपुरवठा या विभागांसाठी राखीव ठेवावा लागत असल्याने आणि त्यातूनच निधी कोठे खर्च करावा, अशा विवंचनेत सापडलेल्या समाजकल्याण विभागाने ही झेरॉक्स मशीनची केलेली खरेदी आता संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे मागील वार्षिक अंदाजपत्रक समाजकल्याण विभागाने बेरोजगारांना रोजगार पुरविण्यासाठी झेरॉक्स मशीन पुरविण्याचा निर्णय घेत त्यासाठी चक्क एक कोटीची तरतूद ठेवली होती. तेव्हा सर्वसाधारण सभेत सर्वच सदस्यांनी त्यास कडाडून विरोध करीत ग्रामीण भागात वीज भारनियमन असताना झेरॉक्स मशीन पुरविणे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे असल्याचे सांगितले होते. त्यावेळी झेरॉक्स मशीनचा हा एक कोटीचा निधी खर्च करण्याचे अधिकार समाजकल्याण सभापती राजेश नवाळे यांना सदस्यांनी दिले होते. प्रत्यक्षात नवाळे यांनी या एक कोटीच्या निधीतील पन्नास लाखांची तरतूद झेरॉक्स मशीन खरेदीसाठी ठेवली व त्यातूनच ही खरेदी झाल्याचे समजते. बाजारपेठेत झेरॉक्स मशीन पुरविण्यासाठी नामांकित कंपन्या त्याही वाजवी अशा ४० ते ५० हजारांच्या दरात झेरॉक्स मशीन देत असताना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने नेमका त्याउलट जास्त दराने आणि त्याही निकृष्ट मशीन खरेदी केल्याचे झेरॉक्स मशीन वितरित करताना लक्षात आल्याचे या सदस्याचे म्हणणे आहे. त्यामुळेच उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी या सदस्याने केली आहे.(प्रतिनिधी) नायब तहसीलदारपदी पदोन्नतीनाशिक : नाशिक विभागातील तेरा अव्वल कारकून व दोन मंडल अधिकाऱ्यांना नायब तहसीलदार म्हणून विभागीय आयुक्तांनी पदोन्नती दिली असून, पदोन्नत झालेल्यांना प्राधान्याने निवडणूक, सिंहस्थ व रोहयो विभागातील रिक्त पदांवर नेमणुका द्याव्यात, असे आदेशजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पदोन्नती मिळालेल्यांमध्ये ए. जी. कोल्हे, एम. ई. मानकर, श्रीमती एम. ए. पावरा, जी. पी. कुळकर्णी, ए. आर. भोसले, जे. पी. निकम, एन. डी. कांबळे, एच. व्ही. पारखी, एन. बी. सुसलादे, डी. आर. जगताप, व्ही. ए. लिलके, श्रीमती व्ही. एस. गायकवाड, पी. जी. वाघ, बी. सी. नगराळे, जी. बी. सूर्यवंशी यांचा समावेश आहे. पदोन्नती मिळून नाशिक येथे बदलून आलेल्या नायब तहसीलदाराची तातडीने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या रिक्तपदी नेमणूक करावी असे आदेश देण्यात आले असून, निवडणूक नायब तहसीलदार, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे रिक्त पद भरावे व त्यानंतर आवश्यकतेनुसार अन्य पदांवर नेमणुका कराव्यात, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.