शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत चुकीच्या गोष्टी घडल्या

By admin | Updated: February 1, 2017 22:20 IST

अजित पवार : भुजबळांवर अप्रत्यक्ष टीका

नाशिक : जिल्हा परिषदेत समविचारी पक्षांशी आघाडी करण्याऐवजी चुकीच्या लोकांना महत्त्व दिले गेल्याने पक्षातील निष्ठावान कार्यकर्ते नाराज झाले, असे आपले वैयक्तिक मत असल्याचे सांगत माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळांवर शरसंधान साधले.वास्तविक राज्यात सर्वच समविचारी पक्षांशी आघाडी असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कॉँग्रेस सोडून अन्य लहान पक्षांना नको तितके महत्त्व दिल्याने त्यांनी जिल्हा परिषदेत पाठिंबा देताना ‘निगोसिएशन’ करीत पदे मिळविल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. आम्हाला पक्षाने प्रत्येकासाठी क्षेत्र ठरवून दिले आहेत. मला सातारा पालकमंत्री आणि अन्य ठिकाणी काम दिल्याने आपण तिथे काम केले.आम्ही कोणाच्या कामात लुडबूड करीत नाही, मात्र नाशिकला जे झाले चुकीचे झाले, असे आपले वैयक्तिक मत असल्याचे सांगत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. पक्षाने भुजबळांना काय कोणालाच वाऱ्यावर सोडलेले नाही. माझ्यासकट सुनील तटकरे यांच्यावरही गुन्हे दाखल आहेत. आम्ही चौकशीला सहकार्य करीत आहोत. आम्ही वकिलांच्या सल्ल्याने काम करीत आहोत. आज भुजबळ तुरुंगात असल्याने ते दोषी ठरत नाहीत. मात्र तुरुंगातील व्यक्तीविषयी जनतेच्या मनात पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, असे सांगत त्यांनी भुजबळांची प्रतिमा पक्षाच्या फलकांवरून हटविण्याचे अप्रत्यक्षरीत्या एकप्रकारे समर्थनच केले. भुजबळांसह दोन्ही माजी खासदार तुरुंगात असल्याने पक्षाला स्थानिक नेतृत्व उरले नसल्याबाबत विचारणा केली असता, पक्ष कोणा एकावर चालत नसतो. स्व. आर. आर. पाटील हे स्वच्छ प्रतिमेचे नेते होते. त्यांच्यानंतर आता त्यांच्या पत्नी व मुलगी राष्ट्रवादीचे काम पाहत आहे. पक्षाने धनंजय मुंडे यांच्यासारख्या युवकांना विरोधी पक्षनेते पद देऊन मोठी जबाबदारी सोपविली असून, ते ती योग्यरीत्या पार पाडत आहे. पक्षाने आता युवकांना जास्तीत जास्त संधी देण्याचा निर्णय घेतल्याचे पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)