शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

गोंधळी समाजाबाबत चुकीचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:12 IST

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या ४९ क्रमांकाच्या अहवालानुसार मागविण्यात आलेल्या हरकती व सूचना सादर करण्याच्या सोबतच गोंधळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाच्या माध्यमातून गोंधळी समाजाने अहवालावरील सूचना व हरकतींसोबतच समाजाच्या विविध मागण्याही प्रशासनासमोर मांडल्या असून, शासनाने गोंधळी समाजाच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याची मागणी केली आहे.

नाशिक : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या ४९ क्रमांकाच्या अहवालानुसार मागविण्यात आलेल्या हरकती व सूचना सादर करण्याच्या सोबतच गोंधळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाच्या माध्यमातून गोंधळी समाजाने अहवालावरील सूचना व हरकतींसोबतच समाजाच्या विविध मागण्याही प्रशासनासमोर मांडल्या असून, शासनाने गोंधळी समाजाच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याची मागणी केली आहे.  गोंधळी समाजाने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून मागासवर्ग आयोगाचे गोंधळी जमातीबाबतचे मत पूर्वग्रहदूषित असल्याचा आरोप केला असून, आयोगाने गोंधळी जमातीचा पूर्ण अभ्यास केला नसल्याची हरकतही नोंदवली आहे. आयोगाच्या ४९ क्रमांकाच्या अहवालानुसार निर्णय झाल्यास गोंधळी जमातीतील वासुदेव, जोशी, डबरी, भराडी, नंदीवाले, चित्रकथी, यांच्यासोबतच्या संबंधावर विपरित परिणाम होईल. तसेच गोंधळी समाज भूमिहीन भिक्षुक जमात असून, कलावंत जमात नाही. त्याचप्रमाणे गोंधळी पुरोहितही नसून राज्यभरात कोणत्याही मंदिरात गोंधळी पुरोहित नसल्याचा दावाही नाशिक जिल्हा रेणुका गोंधळी समाज संस्थेतर्फे करण्यात आला असून, यांसह समाजाच्या विविध मागण्यांसाठी संस्थेतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.  यावेळी रेणुका गोंधळी समाज संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांसह गोंधळी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.