उपनगर : आगरटाकळी पंचक्रोशीचे आराध्य दैवत असलेल्या श्री म्हसोबा महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त कुस्त्यांची दंगल उत्साहात पार पडली.उपनगर येथील श्री म्हसोबा महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त लोकराज प्रतिष्ठानतर्फे रविवारी सायंकाळी यात्रोत्सवाच्या समाप्तीनिमित्त कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. कुस्त्यांच्या दंगलीमध्ये नाशिक, निफाड, सिन्नर, इगतपुरी, मालेगाव, पिंपळगाव आदि भागांतील पहिलवान सहभागी झाले होते. ५० रुपयांपासून हजार रुपयापर्यंतचे पारितोषिक असलेल्या कुस्त्या लावण्यात आल्या होत्या. अखेरची मानाची कुस्ती युवराज तेहरे व भूषण नागरे यांच्यात लोकराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय ओहळ यांच्या हस्ते लावण्यात आली. नाशिकचा पहिलवान युवराज तेहरे याने मानाच्या कुस्तीचा लोकराज श्री हा किताब पटकविला. पंच म्हणून पिंटूु तांबोळी, संदीप सहाने, अविनाश फडोळ आदिंनी काम पाहिले. यावेळी संजय खैरे, दशरथ कदम, शंकर गोसावी, नीलेश सहाने, ललित ओहळ, राहुल शिंपी, जितेंद्र जोशी, रवींद्र पाटील, संजय लोखंडे, निवृत्ती पागेरे, खंडु जाधव आदिंसह कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
म्हसोबा महाराज यात्रेत कुस्त्यांची दंगल
By admin | Updated: May 17, 2016 23:57 IST