शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

सिडको परिसरात महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:20 IST

: परिसरात महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक विद्यालय, उंटवाडी शाळेत महात्मा जोतिबा फुले पुण्यतिथीनिमित्त समिती अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्र म आयोजित करण्यात आला.

सिडको : परिसरात महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक विद्यालय, उंटवाडी शाळेत महात्मा जोतिबा फुले पुण्यतिथीनिमित्त समिती अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्र म आयोजित करण्यात आला. यावेळी महात्मा फुले यांच्या वेशभूषेत आदित्य पाटील व सावित्रीबाई यांच्या वेशभूषेत नमिता खैरनार होती.  मुख्याध्यापिका राजश्री खोडके यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा परिचय करून दिला. यावेळी स्मिता बोरसे व महेंद्र गवळी यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन नंदिता घुले हिने केले. तेजल शिंदे हिने आभार मानले.माध्यमिक विद्यालय, उंटवाडीमाध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे महात्मा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापिका रत्नप्रभा सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्र म झाला. कार्यक्र माचे नियोजन वर्गशिक्षिका अश्विनी वाघ यांनी केले. उपमुख्याध्यापिका प्रियंका निकम व प्रवीण जाधव यांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितली. विद्यार्थी जान्हवी चव्हाण, श्रेया महाले, नुकूल बाळनाथ, समर्थ बिराढे यांनी महात्मा फुले यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. सूत्रसंचालन श्रेया शिंदे हिने केले तर आभार पूजा दिवे हिने मानले.दुपार सत्रात अमोल भडके यांनी मार्गदर्शन केले. सुनंदा कुलकर्णी यांनी गोष्टीच्या माध्यमातून महात्मा फुले यांचा जीवनपट उलगडला. याप्रसंगी पर्यवेक्षक अशोक कोठावदे, पर्यवेक्षक मधुकर पगारे, शिक्षक प्रतिनिधी दिलीप पवार, विजय मापारी, भास्कर कर्डिले, तानाजी जाधव, गोकुळ ढोले व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.शहर राष्टवादीकडून फुलेंना आदरांजलीक्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष नानासाहेब महाले यांच्या हस्ते राष्ट्रवादी भवन येथे महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या कार्याचा उल्लेख करताना सांगितले, महात्मा फुले हे थोर विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा व अस्पृश्य मुलांसाठी पुण्यातील भिडे वस्तीत शाळा उघडली. स्त्री व शुद्र यांच्या शिक्षणाची परवड थांबवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी अविरतपणे केले. त्यामुळेच आज पतित स्त्रियांचा उद्धार तसेच अनाथ, अर्भक यांचे संरक्षण व संवर्धन यांचा शासनप्रणीत कार्यक्रम सुरू झालेला आहे. सरकारला क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या अष्टपैलू गुणांचा अभ्यास करण्याची गरज आहे. याप्रसंगी अनिता भामरे, पद्माकर पाटील, अनिल परदेशी, संदीप शिंदे, किरण पानकर, डॉ. संदीप चव्हाण, संतोष भुजबळ, सुनील घुगे, गणेश चबरे, भाई कंसारा, गणेश अहिरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.नाशिक भाजपामहात्मा जोतिबा फुले यांची पुण्यतिथी भाजपा कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्या स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके व मध्य पश्चिम मंडलचे अध्यक्ष देवदत्त जोशी यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सुजाता करजगीकर, भारती बागुल, नंदकुमार देसाई, माणिकराव देशमुख, गणेश कांबळे, अरु ण शेंदुर्णीकर, शैलेश जुन्नरे, धनंजय पुजारी, राजू मोरे, सोनल दगडे, अशोक गालफाडे, रवींद्र भालेराव, सुखदेव ढिकले, देवेंद्र चुंभळे, विजय कुलकर्णी, नितीन कार्ले, यश जंगम आदी उपस्थित होते. आभार वसंत उशीर यांनी मानले.

टॅग्स :Nashikनाशिक