शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

पंचतत्त्वानुसार उपासना पद्धती वेगळी

By admin | Updated: September 20, 2015 23:04 IST

कार्ष्णी स्वामी गुरुशरणानंद : संवित स्तोत्रावलीचे प्रकाशन

नाशिक : मनुष्याचे शरीर हे पृथ्वी, आकाश, अग्नी, वायू आणि जल या पंचतत्त्वापासून बनले असून, परमेश्वरदेखील या पाच तत्त्वांनुसार स्वरूप साकार झाला आहे. ज्या शरीरात जे तत्त्व अधिक त्याप्रमाणे मनुष्य त्या देवतांची भक्ती-उपासना करतो. म्हणजे पृथ्वीतत्त्व अधिक असेल तर शिवभक्ती करतो आणि आकाशतत्त्व अधिक असेल तर विष्णूभक्ती करतो; परंतु अनेक रूपे असली तरी परमेश्वर एकच आहे, असे विचार कार्ष्णी स्वामी गुरुशरणानंद महाराज यांनी मांडले. पंचवटीतील भक्तिधाम-कैलास मठ येथे सुरू असलेल्या रामकथेच्या समारोप व स्वामी संविदानंद सरस्वती संकलित संवित स्तोत्रावली ग्रंथाचे प्रकाशन सभारंभात महाराज बोलत होते. याप्रसंगी पुढे महाराज म्हणाले की, आपल्या सनातन हिंदू धर्मावर अनेक आरोप होतात; परंतु मन, बुद्धी, चित्त यांची एकाग्रता साधून अहंकाराचा नाश करण्याचे सामर्थ्य धर्म ग्रंथात व साधू-संतांच्या विचारात आहे. देवाचे स्वरूप अनंत आहे. परमेश्वर प्राप्तीचा खरा मार्ग जाणून घेण्यासाठी धर्मग्रंथाचे वाचन व अभ्यास व्हावा, असे सांगून त्यांनी स्वामी संविदानंद सरस्वती यांनी संकलित केलेल्या स्तोत्र ग्रंथाचे कौतुक केले. याप्रसंगी रामकथा प्रवचनकार प्रेमभूषण महाराज, मलुकापीठाधिश्वर राजेंद्र देवाचार्य महाराज, स्वामी कैलाशानंद महाराज, स्वामी अवधेशानंद महाराज, स्वामी हरिचैतन्य महाराज आदिंनी विचार मांडले. प्रास्ताविकात स्वामी संविदानंद महाराज यांनी कैलास मठाची परंपरा तसेच, ग्रंथाच्या संकलनामागील संकल्पना स्पष्ट केली. याप्रसंगी व्यासपीठावर उपमहापौर गुरुमित बग्गा, सिद्धानंद महाराज, महेशानंद महाराज, अमित चंदजी, नरेश सभरवाल, लालचंद गुप्ता, अभयनंद महाराज आदि उपस्थित होते. यावेळी संत-महंतांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन श्याम चैतनजी यांनी केले.