शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक मतदारांची अपेक्षित साथ न मिळाल्याने आघाडीत चिंता; युतीत मात्र वाढली स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 01:05 IST

विशिष्ट भागाची आणि विशिष्ट समुदायाची गठ्ठा मते गृहीत धरणे हे नेहेमीच धोक्याचे ठरू शकते. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत हा मध्य नाशिक मतदारसंघात कॉँग्रेस-राष्टÑवादीला आलेला अनुभव यंदाही कायम राहिला आहे.

विशिष्ट भागाची आणि विशिष्ट समुदायाची गठ्ठा मते गृहीत धरणे हे नेहेमीच धोक्याचे ठरू शकते. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत हा मध्य नाशिक मतदारसंघात कॉँग्रेस-राष्टÑवादीला आलेला अनुभव यंदाही कायम राहिला आहे. या मतदारसंघात युतीने मांडलेली मुसंडी बघता पारंपरिक मतदार हेदेखील बदलाच्या कौलाच्या दिशेनेच जात असल्याचे स्पष्ट होत असून, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्यादृष्टीने वाटचाल केले तरच युतीला आव्हान देणे विरोधकांना शक्य होणार आहे.२००९ मध्ये विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना केल्यानंतर मध्य नाशिक मतदारसंघ तयार झाला. यातील पूर्व भागातील गावठाण आणि दलित-मुस्लीम समाजाची गठ्ठा मते ही नेहेमीच धर्मनिरपेक्ष पक्षांच्या दृष्टीने सोयीने मानली गेली आहेत. त्यामुळे मध्य नाशिक विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी कॉँग्रेस-राष्टÑवादीची नेहमीच तयारी असते. परंतु सलग दुसऱ्या लोकसभेतदेखील मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघ महाआघाडीला वाटतो तितका सोयीचा नसल्याचे स्पष्ट झाले आहे.यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात ३ लाख १५ हजार ९४७ पैकी १ लाख ७६ हजार ७८० म्हणजे ५५.९५ टक्के मतदान झाले होते. मतमोजणीत युतीचे हेमंत गोडसे यांना ९४ हजार ४२९, तर आघाडीचे समीर भुजबळ यांना ५६ हजार ४५९ मते मिळाली. त्या तुलनेत पवन पवार यांना १५ हजार ४०५ मते मिळाली. म्हणजेच महाआघाडीला या मतदारसंघातून मताधिक्य मिळालेले नाही. त्यामुळे हादेखील महाआघाडीच्या दृष्टीने सूचक इशाराच मानला पाहिजे. गावठाण, टाकळी, वडाळा यासह अन्य भागांतील दलित अल्पसंख्याकांची मते आपल्यालाच मिळतील असे गेल्या दोन विधानसभा निवडणुकीपासून आघाडी दावा करीत आली आहे. परंतु प्रत्यक्षात दोन्ही वेळचे दावे फोल ठरले आहेत.भाजपाला सेनेची वाढणार डोकेदुखीमध्य नाशिक मतदारसंघात दलित अल्पसंख्याकांच्या मतामुळेच भाजपाला हा मतदारसंघ सोयीचा नाही असे मानले गेले, परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीत प्रा. देवयानी फरांदे यांनी या मतदारसंघात विजय मिळवला. लाटेवर स्वार होणारा शहरी मतदार ही आजवरच्या दोन विधानसभा निवडणुकीची खासियत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी निवडणुकीसाठी या मतदारसंघातून विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांना पक्षातून आव्हान देणारे अनेक नेते आहेत. यात प्रामुख्याने माजी आमदार वसंत गिते यांच्यासह अन्य इच्छुकांची नावे घेतली जात आहे. पक्षाच्या वतीने सर्वे करून उमेदवारी दिली जात असली तरी शिवसेनेकडूनही दावेदारी केली जात आहे. त्यामुळे भाजपाची डोकेदुखी वाढणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालnashik-pcनाशिक