वणी:कसबे वणी व परिसरातील आदिवासी बांधवातर्फे जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. कळवण चौफुली येथे भगवान बिरसा मुंडा चौक या ठिकाणी कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जि.प. सदस्या छाया गोतरणे प.स. सदस्या बर्डे वणीच्या सरपंच सुनिता भरसट, उपसरपंच मनोज शर्मा, व्यापारी बँकेचे अध्यक्ष विलास कड ,माजी सरपंच मधुकर भरसट, ग्रा.प. सदस्य देवंद्र गांगुर्डे, स.पो.नि. प्रविण पाडवी , रविकुमार सोनवणे, आनंदा चौधरी व परिसरातील आदिवासी बांधव उपस्थीत होते.कार्यक्र माची सुरवात धान पुजा, कणीकंसरा व निसर्ग देवतेची पुजा करून करण्यात आली. त्यानंतर ध्वजारोहण करु न पारंपारिक वाद्य पावरी,सांभळ वाद्य पथकासह भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले. या मिरवणूकीत आदिवासी युवकांनी जय आदिवासी, प्रकृती ही जीवन असे घोष वाक्य छापलेल्या टोप्या परिधान करून मिरवणुकीची शोभा वाढवली. कळवण चौफुली, कॉलेज,वणी पोलिस स्टेशन, संताजी चौक, देवी मंदिर चौक, शिंपी गल्ली या मार्गाने मिरवणूक काढण्यात आली .
आदिवासी बांधवातर्फे जागतिक आदिवासी दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 16:27 IST
वणी परिसरात निसर्ग देवतेचे पुजन
आदिवासी बांधवातर्फे जागतिक आदिवासी दिन
ठळक मुद्दे वणी:कसबे वणी व परिसरातील आदिवासी बांधवातर्फे जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. कळवण चौफुली येथे भगवान बिरसा मुंडा चौक या ठिकाणी कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते.