शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

मनपामार्फत जागतिक अंतराळ सप्ताह

By admin | Updated: September 23, 2015 00:16 IST

तारांगणमध्ये उपक्रम : विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा

नाशिक : महापालिकेच्या तारांगण प्रकल्पाच्या माध्यमातून दि. ४ ते १० आॅक्टोबर या कालावधीत जागतिक अंतराळ सप्ताह साजरा केला जाणार असून त्यात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा तसेच खगोलप्रेमींसाठी वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांनी दिली.महापालिकेच्या धूळखात पडलेल्या ‘तारांगण’ या प्रकल्पाला संजीवनी दिल्यानंतर अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांनी आता तारांगणच्या माध्यमातूनच दि. ४ ते १० आॅक्टोबर या कालावधीत जागतिक अंतराळ सप्ताह साजरा करण्याचे नियोजन केले आहे. विज्ञानप्रेमींच्या या कुंभमेळ्यात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने इयत्ता सातवी आणि त्यापुढील वर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोस्टर आणि निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यासंबंधी विषय निश्चित करण्यात आले आहेत. तसेच विज्ञानविषयक प्रतिकृती तयार करण्याचीही स्पर्धा घेण्यात येणार आहे. सदर स्पर्धा खगोलप्रेमींसाठी खुली ठेवण्यात आली आहे. संबंधित शाळा व महाविद्यालयांना सहभागासंबंधी पत्र पाठविण्यात आले आहे. त्याचबरोबर तारांगण येथे दुर्बीण बनविण्याची कार्यशाळा, आकाश निरीक्षणाचा उपक्रम आणि तज्ज्ञ मान्यवरांची व्याख्यानेही आयोजित करण्यात येणार आहेत. मुलांमध्ये अंतराळ विज्ञानाबाबत आवड निर्माण व्हावी व त्यात करिअर करता यावे, यासाठी कल्पना युथ फाउण्डेशन, इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्स आणि विज्ञान प्रबोधिनी यांच्या सहकार्याने सप्ताह साजरा केला जाणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)