नाशिक : भारतात वेगाने प्रगती करत असलेल्या नाशिकच्या ग्राहकांना जागतिक दर्जाची सेवा देतानाच त्यांना आलिशान अनुभव देण्यासाठी मर्सिडीज बेन्झ वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन मर्सिडीज बेन्झचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी एबरहार्ड कर्न यांनी येथे व्यक्त केले़ अंबड औद्योगिक वसाहतीत गरवारे पॉइंट येथे मर्सिडीज बेन्झच्या जागतिक दर्जाच्या इंडिश मोटोरेन या शोरूमच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ कर्न व इंडिश मोटोरेनचे संचालक ओम मोहरीर यांच्या हस्ते फीत कापून शोरूमचे उद्घाटन झाले़ या शोरूममध्ये मर्सिडीजच्या विविध आधुनिक गाड्यांच्या विक्रीसह ग्राहकांना फायनान्स, विमा, सुरक्षा साधने तसेच सर्व्हिस यासह जागतिक दर्जाच्या विविध १४ सेवा देण्यात येणार आहेत़
जागतिक दर्जाच्या मर्सिडीज बेन्झ शोरूमचा शहरात प्रारंभ नाशिककरांना आलिशान अनुभव देण्यासाठी वचनबद्ध : एबरहार्ड कर्न
By admin | Updated: November 14, 2014 01:24 IST