शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीला वर्ल्ड बॅँकेचे सहाय्य?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:21 IST

स्मार्ट सिटी अभियानांतर्गत महाराष्टÑातील घोषित झालेल्या शहरांमध्ये राबविण्यात येणाºया प्रकल्पांना वर्ल्ड बॅँकेचे अर्थसहाय्य लाभण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात बुधवारी (दि.२३) मुंबईत वर्ल्ड बॅँकेच्या प्रतिनिधींची बैठक होऊन त्यात नाशिकच्या एसपीव्ही कंपनीनेही प्रकल्पांचे सादरीकरण केले.

नाशिक : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत महाराष्टÑातील घोषित झालेल्या शहरांमध्ये राबविण्यात येणाºया प्रकल्पांना वर्ल्ड बॅँकेचे अर्थसहाय्य लाभण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात बुधवारी (दि.२३) मुंबईत वर्ल्ड बॅँकेच्या प्रतिनिधींची बैठक होऊन त्यात नाशिकच्या एसपीव्ही कंपनीनेही प्रकल्पांचे सादरीकरण केले.केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत महाराष्टÑातील ११ शहरांचा समावेश करण्यात आला आहे. या शहरांनी तयार केलेल्या प्रकल्प आराखड्यानुसार काही शहरांमध्ये प्रत्यक्ष कामांनाही सुरुवात झाली आहे. सदर प्रकल्पांना काही अर्थसहाय्य करता येईल काय या उद्देशाने केंद्र सरकारने वर्ल्ड बॅँकेच्या प्रतिनिधींना महाराष्टÑातील स्मार्ट सिटी अभियानाचा आढावा घेण्यासाठी पाठविले आहे. बॅँकेच्या प्रतिनिधींसमवेत बुधवारी मुंबईत बैठक झाली. यावेळी नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन या कंपनीनेमार्फतही काही प्रकल्पांचे सादरीकरण झाले. या बैठकीला महापालिकेचे उपअभियंता सी. बी. अहेर तसेच कंपनीचे प्रकल्प सल्लागार, अभियंता उपस्थित होते. स्मार्ट सिटी अभियानांतर्गत घोषित झालेल्या शहरांना केंद्र सरकारकडून ५० टक्के निधी मिळणार असून, २५ टक्के निधी राज्य शासनाकडून प्राप्त होणार आहे तर महापालिकेला २५ टक्के निधी उभारावा लागणार आहे. प्रतिवर्षी महापालिकेला सुमारे ५० कोटी रुपये उभे करावे लागणार आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत काही प्रकल्पांना वर्ल्ड बॅँकेमार्फत अर्थसाहाय्य करता येईल काय, याची चाचपणी केली जात आहे. महापालिकेने यापूर्वीच सिंहस्थ अनुदानातील न वापरलेला सुमारे ५० कोटींचा निधी स्मार्ट सिटीतील प्रकल्पांसाठी वर्ग करण्याची मागणी शासनाकडे केलेली आहे.मोदींची व्हिडीओ कॉन्फरन्स स्थगितस्मार्ट सिटीतील प्रकल्पांचा आढावा बुधवारी दुपारी ३.३० वाजता स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेणार होते. परंतु, सदर व्हिडीओ कॉन्फरन्स स्थगित झाल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता व स्मार्ट सिटी कंपनीचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम पवार यांनी दिली. दरम्यान, स्मार्ट सिटी अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या कालिदास नूतनीकरणाच्या कामानंतर आता लवकरच नेहरू उद्यान व महात्मा फुले कलादालनाच्याही कामांना गती दिली जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.