शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील अधिकाºयांचे कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 01:47 IST

उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांना भररस्त्यात झालेल्या मारहाणीचे राज्यात पडसाद उमटले असून, महाराष्टÑ विकास सेवा संघटनेच्या अधिकाºयांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. नाशिक शाखेच्या वतीने आंदोलनात सहभाग घेतला असून, अधिकाºयांना संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.

नाशिक : उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांना भररस्त्यात झालेल्या मारहाणीचे राज्यात पडसाद उमटले असून, महाराष्टÑ विकास सेवा संघटनेच्या अधिकाºयांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. नाशिक शाखेच्या वतीने आंदोलनात सहभाग घेतला असून, अधिकाºयांना संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.  याबाबत महाराष्ट्र विकास सेवेच्या नाशिक शाखेच्या वतीने विभागीय आयुक्त महेश झगडे तसेच जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. महाराष्ट्र विकास सेवेतील अधिकाºयांना संरक्षण देण्यासाठी एक शस्त्रधारी पोलीस देण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. महाराष्ट्र विकास सेवेच्या नाशिक शाखेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र विकास सेवेतील अधिकाºयांना शासकीय काम करताना शिवीगाळ करणे, धक्काबुक्की करणे, मारहाण करणे असे प्रकार वाढत आहे. उस्मानाबाद जिल्ह्णातील परांडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांना भर रस्त्यावर अमानुषपणे मारहाण करण्यात आली असून, सदर कृत्य हे मानसिक मनोबल खच्चीकरण करणारे आहे. अशा घटना महाराष्ट्रात उदगीर, हिंगोली, मंठा, परभणी, चाळीसगाव, औरंगाबाद, यवतमाळ, कळंब, रिसोड, धुळे येथेदेखील घडल्या आहेत. राज्यतील ३४ जिल्हा परिषद मुख्यालय, ३५६ पंचायत समित्यास्तरावर कार्यरत असलेले गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, यांना संरक्षण म्हणून एक शस्त्रधारी पोलीस देण्याची मागणी संघटनेने केली आहे.  याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप चौधरी, प्रमोद पवार, राजेंद्र पाटील, मधुकर मुरकुटे, प्रतिभा संगमनेरे, किरण जाधव, डोंगर बहिरम, सुनील अहिरे, पांडुरंग कोल्हे, आनंद पिंगळे, भुपेंद्र बेडसे, हिरामन मानकर, केशव गड्डापोड, जितेंद्र देवरे, महेश पाटील, जगन्नाथ सूर्यवंशी, भालचंद्र बहिरम, रत्नाकर पगार, संदीप कराड, महेंद्र कोर, भारत वेंदे, संदीप वाठरकर, शरद कासार, नीलेश पाटील, राजेंद्र देसले, अन्सार शेख, किसान खताळे, शिवा जाधव, अनिल भुसावरे, धीरज पाटील, दिलीप सोनकुळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय