शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत विभागाचे कामकाज पेपरलेसकडे

By admin | Updated: December 22, 2016 00:58 IST

ई-मेलवर कामांची माहिती मागविली

गणेश धुरी : नाशिकदेश आणि राज्य कॅशलेसकडे वाटचाल करीत असताना आणि देशाच्या पंतप्रधानांनी डिजिटल इंडियाचा नारा दिलेला असताना, जिल्हा परिषदेच्या एका विभागाने त्यादृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. ग्रामपंचायत विभागाचा कारभार जास्तीत जास्त पेपरलेस होण्यासाठी विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या कामकाजाची माहिती ई-मेलवर मागविण्यास सुरुवात केली आहे.ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांनी विभागातील सहायक गटविकास अधिकारी रत्नाकर पवार, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश थेटे यांच्यासह सर्व वीस सहकाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन कामकाजाची माहिती ई-मेलवर देण्यास सांगितले आहे. त्यासाठी विशिष्ट प्रपत्रात त्यांनी विभागातील कर्मचाऱ्यांकडून माहिती मागवून रत्नाकर पवार व प्रकाश थेटे यांचे वैयक्तिक ई-मेल वगळता अन्य १८ कर्मचाऱ्यांना स्वतंत्रपणे ग्रामपंचायत विभागाचे ई-मेल तयार केले आहे. विशिष्ट प्रपत्रात कोणाकडे कोणते काम आहे, त्याने ते किती दिवसात करणे अपेक्षित आहे, कोणती नस्ती कोणाकडे प्रलंबित आहे, त्या नस्तीला विलंब का झाला, यासह सर्व बारीक सारीक तपशील या माहितीपत्रात असणार असल्याचे समजते. तसेच सर्वच कर्मचाऱ्यांनी त्यांना द्यावयाची माहिती त्यांच्या मेलवर (संकेतस्थळावर) देणे अपेक्षित  आहे.  या सर्व ई-मेलवरील विभागातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीचे संकलन करण्यासाठी एका स्वतंत्र कर्मचाऱ्याची नेमणूक केली आहे. या कर्मचाऱ्याकडे एक लॅपटॉप देण्यात आला आहे. ग्रामपंचायत विभागाने अन्य विभागांवर आघाडी घेत कारभार पेपरलेस करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)