देवळालीकॅम्प : केंद्र शासनाने सातवा वेतन लागू करताना कामगारांचे हित लक्षात घेतले पाहिजे. शासनाने कामगार हिताचे रक्षण न केल्यास कामगार युनियन पुढील भूमिका ठरवेल, असे प्रतिपादन एम.इ.एस. एम्प्लॉईज युनियन पुणे शाखेचे उपाध्यक्ष एच. आर. कातोरे यांनी केले.लहवित रोडवरील अष्टविनायक लॉन्स येथे अखिल भारतीय संरक्षण कामगार संघ संलग्न एम.इ.एस. एम्प्लॉईज युनियन पुणे शाखेच्या वतीने आयोजित ६७वे वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन देवळाली एम.इ.एस.चे कमांडर वर्क्स इंजिनियर एस. के. तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून देवळाली येथील गॅरिसन इंजिनियर मेजर अमित शर्मा, सुब्रहराव, एम. ई. बी. यु. कुल, पी. एस. जाधव, ए. आर. शेलार, के. एम. पाळदे आदि मान्यवर उपस्थित होते. अधिवेशनात एम.इ.एस. कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात चर्चा करण्यात येऊन ठराव व बजेट कमिटीची निवड करण्यात आली.गेल्यावर्षीच्या अधिवेशनाचे इतिवृत्त वाचुन मंजुर करण्यात आले. मेळाव्यास देवळाली युनियनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर आहेर, सुधाकर ताजनपुरे, महेंद्र पाटील, संजय पगारे, रामदास ढेरिंगे, आर. एस. लोखंडे, एन. बी. हंबीर, एच. चक्रवर्ती, व्ही. एस. जवजाला, एच. ए. सिद्दीकी, के. डी. भगत, एस. आय. शेख, जी. एस. पाटील आदिंसह राज्यातील ठिकठिकाणच्या गॅरिसन इंजिनिअर येथील प्रतिनिधी उपस्थित होते. (वार्ताहर)
केंद्राने कामगारांचे हित जोपासले पाहिजे
By admin | Updated: March 26, 2015 23:53 IST