नाशिक : शहरातील वाढती गुंडगिरी व रिक्षाचालकांवर पोलिसांकडून केली जाणारी एकतर्फी कारवाईच्या निषेधार्थ श्रमिक रिक्षा-टॅक्सी ट्रक-टेम्पोचालक सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. गोल्फ क्लब मैदानापासून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व श्रमिक सेनेचे अध्यक्ष सुनील बागुल यांनी केले. शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी दत्ता गायकवाड, पुरुषोत्तम पाथरे, मामा राजवाडे, अजय बागुल, बाळासाहेब पाठक, संदीप जाधव, दिनेश जाधव, गजेंद्र चव्हाण आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
श्रमिक सेनेचा ‘निषेध’ मोर्चा
By admin | Updated: October 17, 2015 23:31 IST