शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

कष्टकरी महिलांचा सत्कार सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:35 IST

येथील ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या १७व्या वर्धापन दिनानिमित्त वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांना स्वच्छतादूत ही पदवी देण्यात आली, तर धुणी-भांडी करणाºया महिलांचा सत्कार करण्यात आला. जुने सिडको येथील स्व. बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलातील ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमा हिरे, मनपा सभागृहनेता दिनकर पाटील, नगरसेवक राजेंद्र महाले, प्रवीण तिदमे, माजी नगरसेवक चंद्रकांत पांडे, कल्पना पांडे, कल्पना चुंभळे आदी उपस्थित होते.

सिडको : येथील ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या १७व्या वर्धापन दिनानिमित्त वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांना स्वच्छतादूत ही पदवी देण्यात आली, तर धुणी-भांडी करणाºया महिलांचा सत्कार करण्यात आला.जुने सिडको येथील स्व. बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलातील ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमा हिरे, मनपा सभागृहनेता दिनकर पाटील, नगरसेवक राजेंद्र महाले, प्रवीण तिदमे, माजी नगरसेवक चंद्रकांत पांडे, कल्पना पांडे, कल्पना चुंभळे आदी उपस्थित होते. यावेळी गरीब कुटुंबातील धुणी-भांडी करणाºया महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार सीमा हिरे, दिनकर पाटील यांसह प्रभागातील नगरसेवक राजेंद्र महाले, प्रवीण तिदमे, कल्पना पांडे व कल्पना चुंभळे यांनी मनोगतात ज्येष्ठांना सर्वतोपरी सहकार्य करून आवश्यक त्या सेवासुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले. यावेळी मंडळास स्टील कपाट, दोन टेबल भेट देणाºया रमेश सोनवणे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कवी रवींद्र मालुंजकरांनी कवितेतील हास्ययोग सादर करीत ज्येष्ठांना हसविले. शिक्षणतज्ज्ञ डॉ. शांताराम रायते यांनी जीवनानंद व विज्ञान या विषयावर मार्मिक दृष्टांत दिले. स्वागत दिनकर शेळके व रमेश सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन सावळीराम तिदमे यांनी तर आभार जयराम गवळी यांनी मानले. याप्रसंगी सुखदेव भामरे, आत्माराम देसले, विजय गोसावी, सुधाकर सोनार, प्रकाश काळे, प्रमिला पांडे, नंदकुमार दुसानिस, देवराम सैंदाणे, रमेश बागुल आदी उपस्थित होते.