शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ कामचुकार पालिका कर्मचाºयांवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:23 IST

श्रावणी सोमवारी दुपारी ४ वाजेपर्यंत महापालिकेची कार्यालयीन कामकाजाची वेळ निश्चित केली असताना लंच टाईमनंतर दुपारीच कार्यालयातून गायब होत श्रावणी ‘हाफ डे’ घेणाºया कामचुकार कर्मचाºयांप्रकरणी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी गंभीर दखल घेतली असून, सुटीचा गैरफायदा घेणाºया कर्मचाºयांवर कारवाईचे संकेत दिले आहेत.

नाशिक : श्रावणी सोमवारी दुपारी ४ वाजेपर्यंत महापालिकेची कार्यालयीन कामकाजाची वेळ निश्चित केली असताना लंच टाईमनंतर दुपारीच कार्यालयातून गायब होत श्रावणी ‘हाफ डे’ घेणाºया कामचुकार कर्मचाºयांप्रकरणी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी गंभीर दखल घेतली असून, सुटीचा गैरफायदा घेणाºया कर्मचाºयांवर कारवाईचे संकेत दिले आहेत. त्यानुसार, आयुक्तांनी प्रशासनाकडून दुसºया श्रावणी सोमवारी (दि. ३१ जुलै) राजीव गांधी भवनमध्ये मुख्यालयात कर्मचाºयांचा बायोमेट्रिकचा डाटा मागविला आहे.महापालिकेने श्रावणी सोमवारी कामकाजाची वेळ सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत केलेली आहे. श्रावणी सोमवारी कर्मचाºयांना दोन तास अगोदरच सुटी देण्याचा पायंडा गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेत चालू आहे. मात्र, श्रावणी सोमवारी दुपारपासूनच कर्मचारी कार्यालयातून गायब होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यानुसार, ‘लोकमत’ टीमने दुसºया श्रावणी सोमवारी दुपारी २ ते ४ या वेळेत पाहणी केली असता, काही विभागांमध्ये तुरळकच कर्मचारी आढळून आले तर काही विभागात सामसूम दिसून आली. ‘लोकमत’ने हा सारा आॅँखो देखा हाल मांडल्यानंतर आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाकडून श्रावणी सोमवारी दि. ३१ जुलै रोजी उपस्थित कर्मचाºयांचा बायोमेट्रिक डेटा मागविला आहे. याबाबत आयुक्तांनी सांगितले, फिल्डवर कुणी कर्मचारी अथवा अधिकारी कार्यरत असेल तर त्याच्याबाबत वेगळा विचार होऊ शकतो परंतु, जे स्थायी कर्मचारी आहेत ते नियोजित वेळेत आपल्या टेबलवर हजर नसतील तर ही अतिशय गंभीर बाब आहे.