शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना पुन्हा मतदार यादीचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 01:07 IST

शिक्षकांना शिक्षकेतर कामे देण्यावरून वाद कायम असतानाच आता पुन्हा एकदा मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचाºयांची गरज भासणार असल्याने त्याकामी बीएलओ म्हणून काम करण्यासाठी शिक्षकांचीच नेमणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, राज्य निवडणूक आयोगाने तसे पत्र जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना दिले आहे.

नाशिक : शिक्षकांना शिक्षकेतर कामे देण्यावरून वाद कायम असतानाच आता पुन्हा एकदा मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचाºयांची गरज भासणार असल्याने त्याकामी बीएलओ म्हणून काम करण्यासाठी शिक्षकांचीच नेमणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, राज्य निवडणूक आयोगाने तसे पत्र जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना दिले आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी १ जानेवारी २०१८ ही अर्हता दिनांक ग्राह्य धरून नवीन मतदार नोंदणीचा कार्यक्रम ३ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबर या महिनाभराच्या कालावधीत मतदार पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने नवीन मतदारांची नोंदणी करतानाच त्यांच्या छायाचित्रासह मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम केले जाणार आहे. देशपातळीवर एकाच वेळी हाती घेण्यात येणाºया या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचाºयांची गरज लागणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे. गट पातळीवर जाऊन प्रत्येक मतदारांची खात्री करण्याचे काम बीएलओ म्हणजे ब्लॉक लेव्हल आॅफिसर यांना करावे लागणार असल्याने त्यासाठी नेहमीपेक्षा अधिक कर्मचारी लागणार असल्यामुळे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महापालिका आयुक्तांनी आपल्या अखत्यारितील शासकीय कर्मचाºयांच्या सेवा या कालावधीत निवडणूक कामांसाठी वर्ग कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वी ज्यांनी बीएलओची कामे केली त्यांनाकामे देऊ नये. शक्यतो नवीन कर्मचाºयांची याकामी नेमणूक करावी, असा सल्लाही आयोगाने दिला आहे.दरम्यान, विशेष आयोगाचे महिनाभर चालणारे काम दैनंदिन कामकाज सांभाळून उर्वरित फावल्या वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या असल्यामुळे शिक्षकांशिवाय दुसरा कोणताच पर्याय प्रशासनासमोर दिसत नाही.