शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

आडगाव-म्हसरूळ रस्त्यावर पथदीपाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 01:02 IST

बळीराज जलकुंभ ते आडगाव म्हसरूळ शिवरोडवर मोठी नागरी वसाहतीबरोबर वसतिगृह, पोलीस वसाहत शिवाय प्रशासकीय कार्यालयाकडे जाण्याचा जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावर नागरिकांचा मोठा राबता असतो.

आडगाव : बळीराज जलकुंभ ते आडगाव म्हसरूळ शिवरोडवर मोठी नागरी वसाहतीबरोबर वसतिगृह, पोलीस वसाहत शिवाय प्रशासकीय कार्यालयाकडे जाण्याचा जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावर नागरिकांचा मोठा राबता असतो. शिवाय गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्याची दहशत पसरल्याने पथदीप बसविण्याची मागणी लक्षात घेऊन मनपा प्रशासनाने प्रत्यक्ष कामाला सुरवात केली आहे.बळीराज जलकुंभ ते आडगाव म्हसरूळ जोडणारा शिवरस्ता (रिंग रोड) हा मेडिकल कॉलेज, मेट कॉलेज, ग्रामीण पोलीस मुख्यालय, महावीर कॉलेजकडे, म्हसरूळ, आडगाव, नर्सिंग कॉलेज, आरोग्य विज्ञान पीठकडे जाण्याचा जवळचा मार्ग असून या रस्त्याच्या वापरामुळे महामार्गावरील वाहतुकीचा ताणदेखील कमी होतो. शिवाय सागर व्हिलेज, श्रीरामनगर, कर्मयोगीनगर, आशा कन्सट्रक्शन, राम गाडीया भवन, के. के. वाघ शाळा, भुजबळ कॉलेज हॉस्टेल, पोलीस वसाहत, एचएएल कर्मचारी वसाहत या मार्गावर आहे. त्यामुळे कायम या रस्त्यावर वर्दळ असते. या मार्गावर अनेक वेळा सोनसाखळी चोऱ्या, भुरट्याचोºया आणि गोळीबार यांसारख्या गंभीर घटना घडलेल्या आहे.नागरिकांत समाधानगेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्यासह वन्य प्राण्यांचा वावर असल्यामुळे परिसरात मोठी दहशत पसरली आहे. या रस्त्याच्या अर्ध्या मार्गावर पथदीप बसविलेले आहे. पण अर्धा मार्ग अंधारात असल्यामुळे रात्रीचे जाणे येणे बरेच लोक टाळतात त्यामुळे उर्वरित मार्गावर पथदीप बसवण्याची मागणी नागरिकांनी केली होती. या वृत्ताची दखल घेऊन मनपा प्रशासनाने प्रत्यक्ष कामाला सुरवात केली आहे. या रस्त्यावर पोल बसविण्यात आले असून, लाइनचे कामदेखील पूर्ण झाले असून, लवकरच पथदीप सुरु होणार असल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाelectricityवीज