शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; मसूद अजहरनं बहिणीवर सोपवली जबाबदारी
2
'पीएम मोदी गोष्टी लपवतात; ट्रम्प त्या उघड करतात', रशियन तेल खरेदीवरुन काँग्रेसचे टीकास्त्र
3
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
4
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
5
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
6
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
7
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
8
फ्रान्सच्या संग्रहालयात 'धूम' स्टाईल चोरी; ८०० कोटींचे दागिने घेऊन चोर फरार; ७ मिनिटांत झाला 'गेम'
9
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...
10
Neeraj Chopra Lieutenant Colonel : राजनाथ सिंह अन् सेनाप्रमुखांकडून 'गोल्डन बॉय'चा सन्मान (VIDEO)
11
अंतर्गत मतभेदांदरम्यान टाटा ट्रस्ट्सनं वेणू श्रीनिवासन यांची आजीवन विश्वस्त म्हणून केली नियुक्ती; आता मेहली मिस्त्री यांच्यावर नजर
12
मोठी बातमी! सोन्या-चांदीचा बुडबुडा फुटला....! एकच झटक्यात सोनं 3725 तर चांदी 10549 रुपयांनी स्वस्त! जाणून घ्या कारण
13
भारी! WhatsApp, Instagram चॅटिंग होणार सुरक्षित; स्कॅम रोखण्यासाठी मेटाने आणलं नवीन टूल
14
कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण
15
फ्लॅटमध्ये लिव्ह-इनमध्ये राहत होतं जोडपं, दिवाळीच्या दिवशी दुर्गंधी आल्यानं उघडला तर...; दृश्य पाहून सगळेच हादरले
16
हिऱ्याच्या खरेदीपूर्वी ‘हे’ चार नियम माहीत करून घ्या! कट, क्लॅरिटी, कलर, कॅरेटचा फॉर्म्युला काय सांगतो?
17
भारताच्या 'या' स्कीममुळे शेजारी चीनला लागली मिरची; तक्रार घेऊन पोहोचला WTO च्या दरबारी
18
बदल्याची आग! "माझ्यासोबत तुझी बहीण पळून..."; टोमण्यांना कंटाळला, घेतला तरुणाचा जीव
19
VIRAL VIDEO : महिलेच्या केसांत अडकला हेअर कर्लर अन् पुढे जे झालं ते बघून तुम्हीही व्हाल हैराण!
20
महिला वर्ल्डकपमध्ये आता सेमीफायनलच्या एका जागेसाठी ३ संघांमध्ये चुरस, भारतासाठी असं आहे समीकरण

सर्व्हर डाउन झाल्याने कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 23:47 IST

नायगाव : आॅनलाइनचे सर्व्हर डाउन झाल्यामुळे शेतकऱ्यांबरोबर सर्वसामान्यांची शासकीय कामे ठप्प झाली आहेत. तलाठी कार्यालयातून मिळणाºया सातबारा उताºयासह विविध दाखले वेळेत मिळत नसल्यामुळे तलाठ्यांना ग्रामस्थांंच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. सर्व्हर डाउनमुळे सुलभ वाटणाºया आॅनलाइन कामाची तलाठ्यांना ‘सजा’ मिळत आहे.

ठळक मुद्देआॅनलाइन कामाची ‘सजा’ : सातबारा, दाखले मिळत नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय

नायगाव : आॅनलाइनचे सर्व्हर डाउन झाल्यामुळे शेतकऱ्यांबरोबर सर्वसामान्यांची शासकीय कामे ठप्प झाली आहेत. तलाठी कार्यालयातून मिळणाºया सातबारा उताºयासह विविध दाखले वेळेत मिळत नसल्यामुळे तलाठ्यांना ग्रामस्थांंच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. सर्व्हर डाउनमुळे सुलभ वाटणाºया आॅनलाइन कामाची तलाठ्यांना ‘सजा’ मिळत आहे.सध्या सर्वच क्षेत्रात आॅनलाइन व्यवहार सुरू झाले आहेत. राज्यातील महसूल विभागातही सुरू झालेले आॅनलाइन कामकाज मात्र गेल्या आठवडाभरापासून सर्व्हर डाउन झाल्याने जिल्ह्यातील विविध शासकीय कामे ठप्प झाल्याने ग्रामस्थांंमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सुलभ वाटणारे आॅनलाइनचे हे काम वारंवार डाउन होणाºया सर्व्हरची ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी गत झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून संपूर्ण जिल्ह्यातील सर्व्हर डाउन झाल्याने शेतकऱ्यांना विविध ठिकाणी कामाला येणारा सातबारा दररोज तलाठी कार्यालयात चकरा मारूनही मिळत नाही. चार गावांचे मिळून एकच तलाठी सजा असलेल्या ठिकाणी काही किलोमीटर अंतराचा प्रवास करून नागरिक येतात; मात्र दररोजच सर्व्हर डाउन असल्याने रिकाम्या हातीच परतण्याची वेळ येत असल्यामुळे शेतकºयांसह ग्रामस्थांना वेळेसह आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.सर्व्हर डाउन होण्याच्या प्रकारामुळे शासकीय योजनांचे कामकाज ठप्प झाले. शासनाच्या कांदा अनुदानासाठी मुदतीत सातबारा न मिळाल्याने हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यातच सर्व्हर डाउनच्या कारणावरून तलाठ्यांना ग्रामस्थांंच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे, तर काम वेळेत होत नसल्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांच्या जाचाचा सामनाही करावा लागत आहे. ग्रामीण भागातील लोकांना सर्व्हर डाउनबाबत समजावून सांगताना तलाठी तात्यांच्या नाकीनव येत आहे. दररोज आपल्या सजेत येऊनही तलाठ्यांना लोकांची कामे करता येत नसल्यामुळे ग्रामस्थांंच्या अपूर्ण कामांची तलाठ्यांना सजेतच सजा मिळत आहे.सर्व्हर डाउनच्या कारणांमुळे शेतकºयांना वेळेत सातबारा उतारा न मिळाल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहे. तसेच आठवडाभरापासून शाळा, महाविद्यालये, जमीन, शेती कर्ज आदींसह विविध ठिकाणी लागणारा सातबारा वेळेत मिळत नसल्याने कागदपत्रांची पूर्तता होत नसल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.- दत्ताराम डोमाडे, सामाजिक कार्यकर्ते, देशवंडीवारंवार अडथळ्यांची शर्यतराज्यातील सर्वच शासकीय कामे संगणकीय झाली आहे. सुरुवातीला सुलभ व तत्काळ सेवा मिळणार असल्याने आॅनलाइन कार्यप्रणालीचे सर्वच थरातून स्वागत झाले. सर्वसामान्य ग्रामस्थांंना या आॅनलाइन प्रणालीची सवय लागण्याच्या आतच अडचणीची वाटणारी सेवा वारंवार सर्व्हर डाउनमुळे सध्या अडथळ्यांची ठरत आहे.