उमराणे : गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या रिपरिप पावसामुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात चिखलाचे साम्राज्य पसरले होते. हे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच बाजार समितीने या वृत्ताची दखल घेत मुरु म टाकून कांदा विक्रेते शेतकऱ्यांसह व्यापारीवर्गाला काहीअंशी दिलासा दिला आहे.उमराणे बाजार समितीत अल्पशा पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले होते. परिणामी कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांसह व्यापारीवर्गाला लिलाव करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. रोखीचा अर्थव्यवहार व उत्तम दर्जाचा भाव आदी कारणांमुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कसमादेनां पट्ट्यातील बहुतांश कांदा उत्पादक शेतकरी कांदा विक्रीसाठी येतात. परंतु बाजार समितीने घेतलेल्या नवीन जागेवरचे कॉँक्रीटीकरणाचे काम गेल्या काही दिवसांपासून रखडल्याने मुख्य आवारात असलेल्या अल्पजागेवर कांदा लिलाव केला जातो. परंतु येथेही कॉँक्रीटीकरण नसल्याने अल्पशा पावसातही मोठ्या प्रमाणात चिखल होत असल्याने वाहनधारकांना वाहने लावण्यासाठी तसेच कांदा मालाचा लिलाव करण्यासाठी व्यापारीवर्गाला मोठी कसरत करावी लागत होती. याशिवाय जास्त चिखल झाल्यास बाजार समितीलगत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील बायपास रस्त्यावर जीव धोक्यात घालून लिलाव करावा लागत असल्याने किमान मुख्य आवारात मुरु म टाकण्यात यावा, अशी मागणी कांदा खरेदीदार व्यापाºयांसह कांदा विक्र ीस आलेल्या शेतकºयांकडून केली गेली होती. सदर वृत्त प्रसिद्ध होताच बाजार समितीने दखल घेत बाजार आवारात मुरुम टाकल्याने शेतकºयांसह व्यापारी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.
उमराणे बाजार समितीत काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 01:31 IST
उमराणे : गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या रिपरिप पावसामुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात चिखलाचे साम्राज्य पसरले होते. हे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच बाजार समितीने या वृत्ताची दखल घेत मुरु म टाकून कांदा विक्रेते शेतकऱ्यांसह व्यापारीवर्गाला काहीअंशी दिलासा दिला आहे.
उमराणे बाजार समितीत काम सुरू
ठळक मुद्देशेतकºयांसह व्यापारी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.