शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सहा वर्षांपासून सातपूर बसस्थानकाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:30 IST

सातपूर : गेल्या सहा वर्षांपासून सातपूर बसस्थानकाचे काम अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. वर्षभरात काम पूर्ण होणे अपेक्षित होते; ...

सातपूर : गेल्या सहा वर्षांपासून सातपूर बसस्थानकाचे काम अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. वर्षभरात काम पूर्ण होणे अपेक्षित होते; पण काम रेंगाळल्याने दीड कोटीच्या कामाला तब्बल सव्वादोन कोटी रुपये खर्च होऊनही बसस्थानक पूर्णत्वास येऊ शकलेले नाही. मनसेचे तत्कालीन आमदार नितीन भोसले यांनी सातपूर गावातील बसस्थानकाच्या कामासाठी दीड कोटी रुपयांचा आमदार निधी शासनाकडून मंजूर करून आणला होता. २०१४ साली भोसले यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बसस्थानक नूतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजन केले. निवडणुकीत भोसले यांचा पराभव होऊन भाजपच्या सीमा हिरे निवडून आल्या. दरम्यान बराच काळ बसस्थानकाचे काम रेंगाळले होते. निधीअभावी ठेकेदाराने काम करण्यास नकार दिला. नागरिकांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन हिरे यांनी बसस्थानकाच्या कामासाठी सरकारकडून ५० लाख रुपयांचा आमदार निधी मंजूर करून आणल्यानंतर कामास सुरुवात झाली. हिरे यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला, मात्र बसस्थानकाचे काम रेंगाळले. या पाच वर्षांच्या कार्यकाळात आमदार हिरे यांनीही ‘फक्त’ विस्तारित कामाचे भूमिपूजन करून घेतले होते.

वास्तविक पाहता त्याकाळी दीड कोटी रुपयांत बसस्थानकाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. आमदार हिरे यांनी त्यांच्या पंचवार्षिक काळात ५० लाखांचा आमदार निधी उपलब्ध करून दिला. आणि आता पुन्हा २५ लाख रुपयांचा आमदार निधी उपलब्ध करून दिला आहे. या २५ लाख रुपयांच्या विस्तारित कामाचा लवकरच शुभारंभ होणार आहे. म्हणजेच सव्वा दोन कोटी रुपये खर्च होणार आहे. तरीही काम रखडले आहे.

तब्बल दोन लाखांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या सातपूरला एक बसस्थानक नाही. सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीत रोजगारासाठी आलेल्या परजिल्ह्यातील नागरिकांना गावी जाण्यासाठी सीबीएस, महामार्ग, ठक्कर बाजार बसस्थानक आदी ठिकाणी जावे लागते.

इन्फो==

सातपूरला अद्ययावत बसस्थानक व्हावे म्हणून दीड कोटी रुपयांचा आमदार निधी उपलब्ध करून दिला होता; पण काम रखडल्याने खर्च वाढला. राज्यात भाजपची सत्ता आणि भाजपचाच आमदार असताना निधी उपलब्ध करून दिला नसल्याने काम रेंगाळले आहे. विद्यमान आमदारांनी केवळ ग्रीन जीमव्यतिरिक्त काहीही काम केलेले नाही. ही या मतदारसंघाची शोकांतिका आहे.

-नितीन भोसले, माजी आमदार

इन्फो==

मागील पंचवार्षिक काळात सातपुरच्या बसस्थानकासाठी ५० लाख रुपयांचा आणि आता पुन्हा २५ लाख रुपयांचा आमदार निधी उपलब्ध करुन दिला आहे. तिसऱ्या टप्प्याच्या कामाला लवकरच सुरुवात होईल. आणि सहा महिन्यात बसस्थानकाचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

-सीमा हिरे, आमदार

(फोटो ०५ सातपुर)