शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा जलवाहिनीचे काम पाडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 01:26 IST

कळवण : पुनंद प्रकल्पातून सटाणा नगरपालिकेच्या जलवाहिनीच्या कामाला उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाली असली तरी या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागासह जिल्हा परिषद व अन्य विभागांची परवानगी घेतली नसल्याचे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता रणजित हांडे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर काम बंद पाडले असून, तशी संबंधितांना नोटीसही बजावली आहे.

ठळक मुद्देविनापरवानगी काम । सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कारवाई

कळवण : पुनंद प्रकल्पातून सटाणा नगरपालिकेच्या जलवाहिनीच्या कामाला उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाली असली तरी या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागासह जिल्हा परिषद व अन्य विभागांची परवानगी घेतली नसल्याचे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता रणजित हांडे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर काम बंद पाडले असून, तशी संबंधितांना नोटीसही बजावली आहे.रस्त्यालगत जलवाहिनी टाकण्यासाठी मशिनरीद्वारे साइडपट्टी खोदून चारी करण्यात येत आहे. सदर काम विनापरवानगीने बेकायदेशीररीत्या सुरू असल्याने ते तत्काळ बंद करावे, या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांची कळवण तालुक्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने भेट घेतली आणि सटाणा नगरपालिका मुख्याधिकारी व जलवाहिनी योजनेचे ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शिष्टमंडळात आमदार जे. पी. गावित, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, तालुकाप्रमुख अंबादास जाधव, हेमंत पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, संदीप वाघ, जितेंद्र वाघ, किशोर पवार, विलास रौंदळ, संदीप पाटील, शांताराम जाधव, मोहन जाधव यांचा समावेश होता.चुकीचे व बेकायदेशीर पद्धतीने जलवाहिनी योजनेचे काम चालू केलेले आहे. राज्यमार्गालगत जलवाहिनीचे काम करताना विनापरवानगीने साइडपट्टी खोदून जलवाहिनी टाकण्यात आली असून, त्यावरून माती टाकण्यात आली आहे. रस्त्याच्या मर्यादित सीमेनुसार संबंधित विभागाची परवानगी घेऊन जलवाहिनी मार्ग ठरवून कामकाज करणे आवश्यक आहे; परंतु सर्व निकष डावलून परस्पर रस्त्यालगत साइडपट्टी खोदून अडीच किलोमीटर घाईघाईने काम चालविले असल्याचा आरोप यावेळी जयश्री पवार यांनी केला. रस्त्यालगतची माती पावसामुळे वाहून आल्याने अपघात घडत असून साइडपट्टी पूर्णपणे खोदून व्यवस्थित न बुजल्यामुळे रस्ता देखील खचला आहे. भविष्यात या राज्यमार्गाचे काम करायचे असल्यास चुकीच्या जलवाहिनीमुळे रस्त्याचे काम करता येणार नसल्याचेही यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. शिष्टमंडळाने सदर प्रकार लक्षात आणून दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने काम थांबविण्याचे आदेश दिलेआहेत. सटाणा नगर परिषद व जलवाहिनी ठेकेदार यांनी राज्यमार्ग २१ वरील साखळी क्रमांक ३७/०० ते ३९/५०० या रस्त्यादरम्यान चुकीच्या व बेकायदेशीर पद्धतीने जलवाहिनीचे काम सुरू केले आहे. साइडपट्टी खोदून जलवाहिनी टाकली आहे. रस्त्याच्या सीमेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाची कुठलीही परवानगी घेतलेली नाही, त्यामुळे काम बंद करण्यात आले आहे.- रवींद्र घुलेकार्यकारी अभियंता, आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभाग, कळवण