शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेने रोखले कार्यारंभ आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 01:35 IST

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होताच गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेला गराडा टाकून बसलेल्या ठेकेदारांनी काढता पाय घेतला असून, निवडणुकीची घोषणा होताच जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची दालने ओस पडली, तर सदस्यांनीही पाठ फिरविल्याने शुक्रवारी जिल्हा परिषदेत शुकशुकाट निर्माण झाला.

ठळक मुद्देआचारसंहितेत कामे सुरू केल्यास गुन्हा । ग्रामसेवक करणार तपासणी

नाशिक : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होताच गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेला गराडा टाकून बसलेल्या ठेकेदारांनी काढता पाय घेतला असून, निवडणुकीची घोषणा होताच जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची दालने ओस पडली, तर सदस्यांनीही पाठ फिरविल्याने शुक्रवारी जिल्हा परिषदेत शुकशुकाट निर्माण झाला. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जिल्हा परिषदेने आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर अनेक कामांचे कार्यारंभ आदेश जारी केले असून, ती कामे यापूर्वीच सुरू झाली असतील तर ठीक, परंतु आचारसंहिता लागू झाल्यानंतर गुपचूप कामे सुरू करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता गृहीत धरून मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी सर्व कामांची पाहणी करण्याचे आदेश जिल्ह्णातील ग्रामसेवकांना दिले आहेत.विधानसभेची आचारसंहिता लागू होताच, जिल्हा परिषदेची गर्दी ओसरली. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. शुक्रवारी दुपारी बारा वाजेपासून जिल्हा परिषद प्रशासनाने आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू केली असून, बांधकाम, लघु पाटबंधारे, पाणीपुरवठा, ग्रामपंचायत आदी विभागांचे दप्तर ताब्यात घेतले असून, कोणत्याही नवीन कामांचे आदेश वा पत्रव्यहार करू नये, अशा स्पष्ट सूचना खाते प्रमुखांना देण्यात आल्या. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून नवीन कामांचे कार्यारंभ आदेश मोठ्या प्रमाणात देण्यात आले, त्या कामांची यादीही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व खाते प्रमुखांकडून मागविली असून, ही यादी निवडणूक विभागाला सादर करण्यात येणार आहे. या नवीन कामांमधील किती कामे प्रत्यक्ष सुरू झाली त्याचीही पाहणी ग्रामसेवकांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. जी कामे सुरू झाली आहेत, ती कामे पूर्ण करण्यात येतील परंतु आचारसंहिता लागल्यानंतर अशी कामे गुपचूप सुरू करण्याचा ठेकेदारांचा प्रयत्न नाकारता येणार नसल्याचे गृहीत धरून मंजूर कामांची यादी तालुका पातळीवर पाठवून कामांची पाहणी करण्यात येणार आहे. तसा प्रकार आढळल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी दिला.भुवनेश्वरी यांनी खातेप्रमुखांना मार्गदर्शन केले असून, तालुका पातळीवरदेखील त्याबाबत दक्षता घेण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे त्या अधिकाºयांशी संवाद साधणार आहेत.पदाधिकाºयांची वाहने जमाभुवनेश्वरी यांनी सर्व खातेप्रमुखांची बैठक घेऊन आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाºयांची वाहने जमा करण्याबरोबरच त्यांच्या कार्यालयाचा राजकीय प्रचारासाठी वापर होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, जिल्हा परिषदेच्या आवारातील पदाधिकाºयांची नामफलके झाकण्यात आली आहेत. जिल्हा परिषदेच्या आवारात अशा पद्धतीने आचारसंहितेची काटेकोरपणे अमलबजावणी सुरू झाली आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019