शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निळवंडी पाडे पुलाचे काम अजूनही अपुर्णं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 15:59 IST

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील पुलाचे काम गेल्या दोन ते तीन वर्षांपासून चालू असून अजूनही या पुलाचे काम ...

ठळक मुद्देठेकेदार बदलून सुद्धा निळवंडी पुलाचे काम कासवगतीनेनागरिकांच्या तक्र ारीला केराची टोपली वाढत्या खड्यांमुळे प्रवासी हैराण

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील पुलाचे काम गेल्या दोन ते तीन वर्षांपासून चालू असून अजूनही या पुलाचे काम होत नसल्याने निळवंडी व परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.निळवंडी ते पाडे या रस्त्यावर असलेला पुलाचे काम अजूनही अपुर्णं असून, दोन वर्षात दोन ते तीन कंत्राटदार बदलेले तरी पण पुलाची अवस्था आहे तशीच आहे.बांधकाम विभाग,याकडे दुर्लक्ष करत आहे. याच नवीन पुलाच्या शेजारी असणारा जुना पूल अर्धा तोडला असून नागरिकांना त्या पुलावरून आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणारा हा पूल आहे.मात्र या पुलाचे काम रखडले आहे.त्यामुळे संभिधत खात्याने त्याची दखल घेऊन ठेकेदार सुद्धा बदलून टाकला मात्र अजूनही हे काम पूर्ण होत नसल्याने या पुलाचे काम कधी होणार?असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.सध्या जुना पूल अर्ध्याबाजूने तोडला असून जवळपासच्या गावांचा सम्पर्क तुटला असून ,नागरिकांची कोंडी झाली असून काही अंतर कापून दिंडोरी बाजारपेठेत नागरिकांना यावे लागते आहे.जुना पूल अर्धा तोडल्यामुळे ननाशी,निगडोळ, वणी खुर्द,नळवाडपाडा,येथील नागरिक वळखेडहुन दिंडोरीकडे यावे लागत आहे.त्यामुळे जवळपास १० ते १२ कि. मी.चा अंतर लांब पडत आहे.त्यामुळे शेतीमाल लवकर बाजारपेठेत पोहचत नसल्याने त्यांचाही फटका शेतकर्यांना बसतो.जर तीन वर्ष्या पूर्वीच ठेकेदाराणे या पुलाचे काम केले असते तर, आता ही वेळ नागरिकांवर आली नसती.तसेच निळवंडी पाडे रस्त्याचीही अतिशय दुरवस्था झाल्याने निळवंडी परिसर हा लोक प्रतिनिधींनी वाळीतच टाकल की काय? असा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडला आहे.निळवंडी परिसर हा विविध विकासकामांपासून वंचीत राहिला आहे या रस्त्यावर मोठेमोठे खड्डे पडले त्यामुळे वाहनचालकांना वाहांचालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.त्यामुळे या पुलाचे काम व निळवंडी -पाडे रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पश्चिम भागातील रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था झाली असुन त्विरत दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे .दिंडोरी ,निळवंडी,पाडे निगडोळ ,हा अति रहदारीचा रस्ता असतानां देखिल अधिकारी ,पदाधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे या रस्त्यांवर खड्यांचे साम्राज्य वाढल्याने हे रस्ते म्हणुन असुन घात अण नसुन संताप असे ठरू लागले आहेत .दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्यातील सर्वच रस्त्यांची चाळण झाली आहे .नुसती चाळणच नाही तर रस्त्यांची महाचाळण म्हटले तर वावगे ठरू नये या रस्त्यांच्या दुरूस्तीबाबत अनेक वेळा आवाज उठवून देखील त्याबाबत कार्यवाही होत नसल्याने आता जनतेचे गाºहाणे मांडावी तरी कुणाकडे पुढारी मुका आणी अधिकारी बिहरा , अशा परिस्थितीमुळे ग्रामस्थांचे हाल होत आहे.(१७निलवंडी आणि १७ निलवंडी १)