शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

संपामुळे कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:26 IST

महसूल कर्मचाºयांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारपासून सुरू झालेल्या बेमुदत संपाच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासह पंधराही तालुुक्यांतील तहसील कार्यालयाचे कामकाज पूर्णत: ठप्प झाले. या संपात कार्यालयीन शिपाईदेखील सहभागी झाल्याने सकाळी अधिकाºयांनाच कुलूप उघडून साफसफाई करावी लागली, तर शासकीय कामासाठी आलेल्या अभ्यागतांना रिकाम्या हाताने परतावे लागले आहे.

नाशिक : महसूल कर्मचाºयांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारपासून सुरू झालेल्या बेमुदत संपाच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासह पंधराही तालुुक्यांतील तहसील कार्यालयाचे कामकाज पूर्णत: ठप्प झाले. या संपात कार्यालयीन शिपाईदेखील सहभागी झाल्याने सकाळी अधिकाºयांनाच कुलूप उघडून साफसफाई करावी लागली, तर शासकीय कामासाठी आलेल्या अभ्यागतांना रिकाम्या हाताने परतावे लागले आहे.दरम्यान, कर्मचाºयांनी संपावर जातांनाच सकाळी कार्यालयात हजेरी लावून यंत्रावर थम्ब केल्याने नियमानुसार ते कामावर असल्याचे चित्र निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. या संपाची शासनाला यापूर्वीच कल्पना देण्यात आलेली असल्याने सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाºयांनी जोरदार निदर्शने केले. महसूल कर्मचारी संघटनेच्या अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित असून, त्यात महत्त्वाचे म्हणजे अन्न व नागरी पुरवठा विभागाने अलीकडेच पुरवठा निरीक्षकांची पदे सरळसेवेने भरण्याचा निर्णय घेतला आहे. तसे झाल्यास अव्वल कारकुनांवर अन्याय होणार असल्याने ही भरती स्थगित करावी ही प्रमुख मागणी संपकरी कर्मचाºयांची असून, त्यापाठोपाठ महसूल कर्मचाºयांचा महसूल सहायक म्हणून नेमणूक देण्यात यावी, नायब तहसीलदारांच्या वेतनातील तफावत दूर करावी, सातवा वेतन आयोग लागू करावा, पाच दिवसांचा आठवडा करावा आदी मागण्यांसाठी दि. ३ आॅक्टोबरपासूनच महसूल कर्मचाºयांनी पुरवठा खात्याच्या कामकाजावर बहिष्कार टाकून आंदोलन छेडले आहे. तरीही शासनाने दखल न घेतल्याने अखेर मंगळवारपासून जिल्ह्यातील ८३४ कर्मचारी बेमुदत संपावर रवाना झाले. सकाळी पावणे दहा वाजता या कर्मचाºयांनी कार्यालयात नियमित हजेरी लावत रजिष्टरवर उपस्थितीची स्वाक्षरी केली. त्यानंतर यंत्रावर थम्ब करून हजर असल्याची नोंद घेतली व कामकाज बंद केले. त्यानंतर सर्वांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने केली. सकाळी कार्यालयात आलेल्या अधिकाºयांना त्यांचे स्वत:चे दालन उघडावे लागले. त्यानंतर स्वत:च्या हातानेच कामकाज करावे लागले. दरम्यान, या संपाची कल्पना नसल्याने शासकीय कामकाजासाठी जिल्हाभरातून आलेल्या अभ्यागतांना आल्या पावलीच माघारी फिरावे लागले.