शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

महिला बचत गटाला मिळाला मिनी ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 16:04 IST

सिन्नर: सिन्नर नगरपरिषद दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत स्थापन संत रोहिदास महिला स्वयंसहाय्यता बचत गटाला नाशिक जिल्हा समाजकल्याण कार्यालयाच्या सामाजिक कल्याण योजना अंतर्गत ९० टक्के अनुदनातून स्वरूपात मिनी ट्रॅक्टर मिळाला आहे.

ठळक मुद्देसमाजकल्याण विभाग: बचत गटाच्या वृध्दीसाठी प्रयत्न

सिन्नर: सिन्नर नगरपरिषद दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत स्थापन संत रोहिदास महिला स्वयंसहाय्यता बचत गटाला नाशिक जिल्हा समाजकल्याण कार्यालयाच्या सामाजिक कल्याण योजना अंतर्गत ९० टक्के अनुदनातून स्वरूपात मिनी ट्रॅक्टर मिळाला आहे.सदर ट्रॅक्टर बचत गटाकडे प्राप्त झाल्यानंतर नगरसेवक सौ. चित्रा लोंढे यांचे हस्ते पूजन करण्यात आले. अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील बचत गटातील सदस्यांची बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धी व्हावी यासाठी समाजकल्याण विभागाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत असतात. ज्या बचत गटात 80 टक्के पेक्षा अधिक सदस्य हे अनुसूचित जाती या प्रवर्गाचे असल्यास अशा बचत गटास जिल्हा समाजकल्याण कार्यालयाच्या सामाजिक कल्याण योजना अंतर्गत ९० टक्के अनुदान (3 लाख 50 हजार रु पये) स्वरूपात मिनी ट्रॅक्टर दिला जातो. बचत गटाने स्व हिस्सा म्हणून १० टक्के रक्कम भरणे आवश्यक आहे.मुख्याधिकारी तथा शहर प्रकल्प अधिकारी संजय केदार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव यांनी संत रोहिदास महिला स्वयंसहाय्यता बचत गटाला जिल्हा समाजकल्याण कार्यालयाच्या सामाजिक कल्याण योजना अंतर्गत मिनी ट्रॅक्टर मिळविण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. गटाच्या अध्यक्षा मंगल जाधव व सचिव शोभा जाधव यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला.संत रोहिदास महिला स्वयंसहाय्यता बचत गटाला मिनी ट्रॅक्टर मिळाल्याबद्दल गटाच्या अध्यक्षा मंगला जाधव यांनी नाशिक जिल्हा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरिसंग वसावे, कनिष्ट लिपिक शांतीलाल सावकार, मुख्याधिकारी तथा शहर प्रकल्प अधिकारी संजय केदार, शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव यांचे आभार मानले. यावेळी वितरक उदय गोळेसर, गणेश जाधव, जयप्रकाश जाधव, शरद जाधव श्रावण वाघ, प्रकाश सांगळे, सागर लोंढे, कैलास सांगळे, अनुराधा लोंढे, संत रोहिदास महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या अर्चना जाधव, विनता तुपे, आशा तुपे, सिमा साबळे, कल्पना म्हैसमाळे, जयश्री सोनवणे, पुजा लोंढे, यशोदा गायकवाड आदी उपस्थित होत्या. 

टॅग्स :WomenमहिलाGovernmentसरकार