शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

लासलगांव बाजार समितिवर महिला राज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 15:31 IST

लासलगाव . कांद्याची जागतिक बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच महिला राज आले असून सभापतीपदी सुवर्णा जगताप तर उपसभापतीपदी प्रीति बोरगुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

लासलगाव : कांद्याची जागतिक बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच महिला राज आले असून सभापतीपदी सुवर्णा जगताप तर उपसभापतीपदी प्रीति बोरगुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गुरूवारी दुपारी नाशिक जिल्हा उपनिबंधक गौतम मालसाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभा आयोजित करण्यात आली होती. संचालकाच्या उपस्थितीत बैठक सुरू होताच सभेचे अध्यक्ष गौतम मालसाणे यांच्या अध्यक्षतेखाली कामकाजात सभापती पदाकरीता सुवर्णा जगताप तर उपसभापतीपदी प्रीति बोरगुडे यांचे एकमेव अर्ज आले. संचालक पंढरीनाथ थोरे ,राजेंद्र डोखळे,नानासाहेब पाटील, सुभाष कराड, शिवनाथ जाधव , रमेश पालवे, वैकुंठ पाटील, नंदकुमार जागा, मोतीराम मोगल, अनिता सोनवणे, भास्करराव पानगव्हाणे उपस्थित होते. सभेस माजी सभापती जयदत्त होळकर, संदीप दरेकर, बाळासाहेब क्षीरसागर, अशोकराव गवळी व सचिन ब्रम्हेचा अनुपस्थित होते. बाजार समतिी सचिव नरेंद्र वाढवणे उपस्थित होते. सभापती सुवर्णा जगताप या भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा प्रसिध्दी प्रमुख असुन त्यांच्या निवडीने या बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी विराजमान झाल्या आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक