शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आयुक्तालयात महिलांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 01:31 IST

‘बालिकेवर अत्याचार करणाºयास कठोर शिक्षा द्या’,‘देवळालीच्या गावगुंडांचा बंदोबस्त करा, महिलांना सुरक्षा द्या’, ‘भयमुक्त देवळाली सुरक्षित देवळाली’ अशा घोषणा देवळालीच्या शेकडो महिलांनी पोलीस आयुक्तालयाच्या द्वारावर देत बालिकेवर अत्त्याचार करणाºया नराधमास फाशीची शिक्षा ठोठावण्याची मागणी शेकडो महिलांनी पोलीस आयुक्तांकडे के ली.

नाशिक : ‘बालिकेवर अत्याचार करणाºयास कठोर शिक्षा द्या’,‘देवळालीच्या गावगुंडांचा बंदोबस्त करा, महिलांना सुरक्षा द्या’, ‘भयमुक्त देवळाली सुरक्षित देवळाली’ अशा घोषणा देवळालीच्या शेकडो महिलांनी पोलीस आयुक्तालयाच्या द्वारावर देत बालिकेवर अत्त्याचार करणाºया नराधमास फाशीची शिक्षा ठोठावण्याची मागणी शेकडो महिलांनी पोलीस आयुक्तांकडे के ली.  देवळाली गाव परिसरातील सुलभ शौचालयात नैसर्गिक विधीसाठी आलेल्या नऊ वर्षीय चिमुरडीवर एका नराधमाने दहा दिवसांपूर्वी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. उपनगर पोलीस ठाण्यात रविवारी (दि.२२) संशयिताविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान, संशयित रवींद्र चौलालसिंग बहोत यास पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयापुढे हजर केले असता येत्या शनिवारपर्यंत (दि.२७) पोलीस कोठडी सुनावली. या नराधमास क ायद्याने कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी नगरसेवक सत्यभामा गाडेकर, सूर्यकांत लवटे व सुनीता कोठुळे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे शंभराहून अधिक महिलांचा जमाव सोमवारी (दि.२३) आयुक्तालयात धडकला. यावेळी पाच महिलांच्या शिष्टमंडळाला आयुक्तांच्या दालनात प्रवेश मिळणार असल्याचे सांगून उर्वरित महिलांना पोलिसांनी रोखल्याने सदर महिलांनी आयुक्तालयाच्या तळमजल्यावर ठिय्या देत ‘नराधमास फाशी झालीच पाहिजे,’ ‘देवळालीमधील गावगुंडांची दहशत संपलीच पाहिजे’ अशा घोषणा दिल्या. आयुक्तांच्या दालनामध्ये पीडित कुटुंबीयांच्या सदस्यांनाही पोलिसांनी प्रवेश नाकारल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. देवळालीगावातील गुंडांची दहशत तसेच आजूबाजूच्या झोपडपट्ट्यांमधून येत दहशत माजविणाºयांचा बंदोबस्त करावा तसेच पीडित बालिकेच्या कु टुंबीयांच्या पुनर्वसनासाठी लागणारा अहवाल आयुक्तांनी जिल्हाधिकाºयांकडे पाठवावा, अशा मागण्यांचे निवेदन पोलीस आयुक्त सिंगल यांना देण्यात आले आहे. निवेदनावर कैलास मोरे, विकास गिते, योगेश शिंदे, शशिकांत चौधरी यांच्यासह महिलांच्या स्वाक्षºया आहेत.आयुक्तांच्या दालनात जाण्यासाठी ‘तू-तू, मैं-मैं’देवळालीगावाच्या महिलांचा मोठा जमाव पोलीस आयुक्तालयात दाखल झाला. यावेळी बंदोबस्तावरील पोलिसांनी बहुसंख्य महिला व पुरुषांना तळमजल्यावरच रोखले. पहिल्या मजल्यावर नगरसेवकांसह पंचवीस ते तीस महिला पोहचल्या. यावेळी दालनात केवळ नगरसेवकांसोबत पाच महिलांना प्रवेश मिळणार असल्याचे सांगितल्यानंतर महिलांचा संताप वाढला. महिला पोलिसांनी यावेळी दालनात जाणाºया महिलांना रोखले असता त्यांच्यासोबत ‘तू-तू मैं-मैं’ झाली.