सिन्नर : येथील ढोकेनगर, कमलनगर व संजीवनीनगर भागात वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी महिलांनी मंगळवारी (दि. १७) दुपारी आडवा फाटा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर सुमारे अर्धा तास ठिय्या आंदोलन केले. यावेळी शाखा अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. ढोकेनगरमधील रोहित्र बदलण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे पूर्वीच प्रस्ताव पाठविलेला आहे. लवकरच तेथे नवीन रोहित्र बसविले जाणार असल्याचे शाखा अभियंता राजेंद्र शिंदे यांनी सांगितले. महिनाभरात नवीन रोहित्र बसविण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले. नगरपालिकेकडून पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर नागरिकांना लगेच विद्युत मोटारी न जोडता आधी तो भूमिगत टाक्यांमध्ये साठवावा व नंतर घराच्या छतावरील टाक्यांमध्ये टाकण्याचा सल्ला शिंदे यांनी यावेळी दिला.वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा या मागणीचे निवेदन शाखा अभियंता शिंदे यांना देण्यात आले. यावेळी नगरसेवक लोखंडे यांच्यासह मनीषा कातार, सरला सांगळे, सपना कोरडे, शीला नवले, शिल्पा गायकवाड, शीतल खडांगळे, अनिता बोराडे, नंदा ढमाले, विजया तेजीमकर, माया काकुस्ते, प्रतिभा साबळे, प्रियंका घुले, उमेशा संकपाळ, कुसुम काकवीपुरे, रंजना सूर्यवंशी, सरिता शिंदे, मनीषा खटावकर, सुरेखा देसले, दामिनी शेलार, मयूरी शेलार, सीमा शिंदे, जयराम ढगे, राजेश्वर पवार, नानाजी बेडशे, विठ्ठल वाघमोडे, सुंदर गायकवाड, विठ्ठल वाघमोडे, प्रल्हाद निमाने, संतोष पवार, मनोज पवार, दीपक तांबे, प्रमोदकुमार सिंग, बबन घुमकर, संगीता बेडसे आदिंसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
वीज वितरणच्या कार्यालयात महिलांचे ठिय्या आंदोलन
By admin | Updated: January 20, 2017 00:11 IST