शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

खंडणी मागणाºया महिला वकिलाचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:32 IST

‘माझ्या क्लार्इंटच्या मुलीवर योग्य उपचार तू केले नाही, तिला औषधांचा साइडइफे क्ट झाला. भरपाई म्हणून अडीच लाख रुपये दे, अन्यथा खोटे गुन्हे तुझ्याविरुद्ध दाखल करू’ अशाप्रकारे धमकावणाºया एका महिला वकिलाचा पोलिसांनी गुरुवारी (दि.२१) संध्याकाळी पर्दाफाश केला.

नाशिक : ‘माझ्या क्लार्इंटच्या मुलीवर योग्य उपचार तू केले नाही, तिला औषधांचा साइडइफे क्ट झाला. भरपाई म्हणून अडीच लाख रुपये दे, अन्यथा खोटे गुन्हे तुझ्याविरुद्ध दाखल करू’ अशाप्रकारे धमकावणाºया एका महिला वकिलाचा पोलिसांनी गुरुवारी (दि.२१) संध्याकाळी पर्दाफाश केला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातपूर परिसरात राहणाºया एका महिला डॉक्टरकडे अडीच लाख रुपयांची खंडणी मागणाºया अ‍ॅड. कामिनी माणिकशा खेरुडकर या पेशाने वकील असलेल्या महिलेला पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईनाका पोलिसांनी अटक केली. खेरुडकर हिने सातत्याने महिला डॉक्टरला धमकावून अडीच लाख रुपये देण्यासाठी दबाव वाढविला होता. कोणतीही चूक नसताना रक्कम का म्हणून द्यावयाची, असा विचार सदर डॉक्टर महिलेच्या मनात आल्याने त्यांनी पाटील यांचे कार्यालय गुरुवारी दुपारी गाठून घडलेला प्रकार कथन केला. त्यानुसार पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक सारिका आहिरराव व पवार यांना तातडीने बोलावून सदर प्रकरणाबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले. यानुसार पोलिसांनी कागदाचे बंडल नोटांच्या आकाराचे तयार करून ते एका पिशवीत भरून डॉक्टर महिलेला खेरुडकर हिने ज्या पत्त्यावर बोलविले तेथे नेऊन देण्यास सांगितले. प्रथम खेरुडकर हिने डॉक्टरला कॅनडा कॉर्नरवर रक्कम घेऊन येण्यास सांगितले. पोलिसांनी तेथे साध्या वेशात सापळा रचला; मात्र उपयोग झाला नाही. खेरुडकर हिने पुन्हा पत्ता बदलून महामार्ग स्थानकाजवळ मुंबई नाका येथे येण्यास सांगितले. त्यानुसार डॉक्टर महिलेचा कॉल ट्रॅप करत मुंबईनाका व सरकारवाडा पोलिसांनी महामार्ग परिसरात सापळा रचला. या ठिकाणी डॉक्टर सदर कागदाचे बंडल भरलेली पिशवी घेऊन पोहचले. त्यांनी खेरुडकर यांच्या हातामध्ये पिशवी सोपविली असता दबा धरून बसलेल्या महिला व पुरुष पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी झडप घालून खेरुडकरसह तिचे साथीदार मधुकर यशवंत नाठे, कमलेश विष्णू लांडगे, अर्जुन तुकाराम रणशूर यांना ताब्यात घेतले.