शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महिला सक्षमीकरण सप्ताहास प्रारंभ

By admin | Updated: August 2, 2016 01:06 IST

नांदगाव : तालुक्यातील सहा मंडलांमध्ये शिबिरांचे आयोजन; दखल पात्र कामांची सरकारी दफ्तरी नोंद

नांदगाव : महिला सक्षमीकरण सप्ताहाची सुरुवात येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष शैला गायकवाड होत्या. तहसीलदार रचना पवार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.दि. १ आॅगस्ट ते ७ आॅगस्टपर्यंत तालुक्यातील सहा मंडलांमध्ये शिबिरे आयोजित करून महिलांच्या सक्षमीकरणाच्या नोंदी सरकारी दफ्तरी करण्यात येणार असल्याची माहिती श्रीमती पवार यांनी दिली.सातबारा, ८ अ च्या उताऱ्यावर महिलांची नावे लागणार, लक्ष्मी योजना, अधिवास, जन्म-मृत्यू, पीकविमा योजना, आत्मा, महिला बचतगट, बीएसएनएल या व इतर बाबींशी निगडित अनेक योजनांची महिलांना माहिती देण्यात येऊन त्यांच्या नावाच्या नोंदी करण्यात येणार आहेत.बाभूळवाडीच्या सरपंच सुशीला भोसरे यांचा सत्कार करण्यात आला. गटविकास अधिकारी चित्रलेखा कोठावळे, नायब तहसीलदार मीनाक्षी बैरागी, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती ठोके, बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती पवार, सुरक्षा केसकर आदिंची समयोचित भाषणे झाली.भाषणांमधून विविध महिला वक्त्यांनी मुलगी झाली तर दु:ख व्यक्त करण्यात येते. मुलींचे स्वावलंबन हीच देशाची प्रगती होय. सामाजिक, शारीरिक सशक्त व बौद्धिक बना, असे विचार व्यक्त केले. सिद्धी बागुल हिने बना मर्दानी.. गरजून सांगा साऱ्या जगा.. असे आवेशपूर्ण विचार मांडले.कार्यक्रमासाठी न्यू इंग्लिश स्कूलच्या नववी व दहावीच्या विद्यार्थिनी, शहर व ग्रामीण भागातून आलेल्या महिलांची गर्दी होती. गुंडांना चोप देणाऱ्या महिला पोलीस मंगला बोरसे व तिची सहकारी यांचा सत्कार करण्यात आला. शिपाई कल्पना हिचा सत्कार करण्यात आला तेव्हा भारावलेल्या कल्पनेने व्यासपीठावरील तहसीलदार रचना पवार व इतरांना आलिंगन दिले तेव्हा सभागृह भारावले. कल्पना आपल्या डोळ्यातले अश्रू रोखू शकली नाही. सूत्रसंचालन शिक्षण विस्ताराधिकारी श्रीमती विजयालक्ष्मी आहिरे यांनी केले. त्यांनी पणती जपून ठेवा या गीताचे गायन करताना मुलींना जपा व सक्षम करा असे नमूद केले. आभार मीनाक्षी बैरागी यांनी मानले. महिलांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आयोजिलेल्या कार्यक्रमानिमित्त नगराध्यक्ष, तहसीलदार, गटविकास अधिकारी, शिक्षण विस्ताराधिकारी महिलाच असल्याचे अधोरेखित झाले. (वार्ताहर)