शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी पोलिसांकडे समस्या मांडाव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 17:21 IST

संजय दराडे :तोरंगण येथे महिलांसंदर्भात कायदे ,सायबर क्र ाईम कार्यशाळा वेळुंजे(त्र्यं): महिलांनी पोलिसांकडे अडीअडचणी, समस्या तसेच तक्र ार असेल तर प्रत्यक्ष ठाण्यात जाऊन रीतसर तक्र ार नोंदवावी.व पोलिसही सहकार्य करतील असा विश्वास देत महिलांनी पोलिसांवर विश्वास ठेवावा असे प्रतिपादन नाशिक जिल्हा पोलीस (ग्रामीण) अधीक्षक संजय दराडे यांनी केले.

ठळक मुद्देहरसूल येथे सॅनिटरी नॅपिकन वेंडिंग मशीनचे उदघाटन पोलीस अधिक्षक (ग्रामीण) संजय दराडे तसेच रोहिणी दराडे यांच्या हस्ते करण्यात आले. तोरंगण येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात एकदिवसीय महिलांविषयी कायदे आणि सायबर क्र ाईम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्

संजय दराडे :तोरंगण येथे महिलांसंदर्भात कायदे ,सायबर क्र ाईम कार्यशाळावेळुंजे(त्र्यं): महिलांनी पोलिसांकडे अडीअडचणी, समस्या तसेच तक्र ार असेल तर प्रत्यक्ष ठाण्यात जाऊन रीतसर तक्र ार नोंदवावी.व पोलिसही सहकार्य करतील असा विश्वास देत महिलांनी पोलिसांवर विश्वास ठेवावा असे प्रतिपादन नाशिक जिल्हा पोलीस (ग्रामीण) अधीक्षक संजय दराडे यांनी केले.तोरंगण (ता.त्र्यंबकेश्वर) येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथील निर्मल गंगा गोदा बहुउद्देशीय संस्थेतर्फे महिलाविषयी कायदे व सायबर क्र ाईम याविषयी एकदिवसीय कार्यशाळेच्या कार्यक्र मप्रसंगी ते अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.हरसूल येथे सॅनिटरी नॅपिकन वेंडिंग मशीनचे उदघाटन पोलीस अधिक्षक (ग्रामीण) संजय दराडे तसेच रोहिणी दराडे यांच्या हस्ते करण्यात आले. तोरंगण येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात एकदिवसीय महिलांविषयी कायदे आणि सायबर क्र ाईम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उदघाटन प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात येऊन संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांची प्रतिमापूजन तसेच दीपप्रज्वलाने कार्यक्र माची सुरु वात करण्यात आली. विद्यार्थिनी यावेळी स्वागत गीत सादर केले.व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा शीतल गायकवाड,सौ.रोहिणी दराडे, सौ.माने,नितीन सोनवणे,सामाजिक कार्यकर्ते मिथुन राऊत,सरपंच कमल बोरसे,हरसुलचे एपीआय प्रवीण साळुंखे,राहुल बोरसे आदींसह मान्यवर उपस्थित होते.ते पुढे म्हणाले की, इतरांकडून महिलांना मानिसक अथवा शारिरीक त्रास होत असेल त्या महिलांनी खचून न जाता नाशिक येथे तक्र ार नोंदवावी.यासाठी तुम्हाला पोलिसही सहकार्य करतील.तसेच पोलिसाविषयी असलेली दृढ भावना बाजूला सारून थेट पोलीस ठाण्यात तक्र ार नोंदवावी.व पोलिसांवरील विश्वास दृढ करण्यासाठी महिलांनी पुढे यावे असे प्रतिपादन केले.यावेळी सौ.रोहिणी दराडे महिला सबलीकरण आण िसक्षमीकरणावर,संस्थेच्या अध्यक्षा सौ. शीतल गायकवाड यांनी महिलांचे आरोग्य तसेच गोदावरी इंटरप्रायजेसचे चेअरमन नितीन सोनवणे यांनी महिला बचत गट रोजगाराच्या संधी याविषयी सखोल मार्गदर्शन केले.यावेळी आर्या इंडस्ट्रीचे प्रशांत बच्छाव, सुजाता बच्छाव यांनी संस्थेस सॅनिटरी नॅपिकन वेंडिंग मशीन भेट देत उपस्थित होते. यावेळी कार्यशाळेत महिला बचत गट,अंगणवाडी सेविका,मदतनीस,शिक्षिका,गृहिणी,महाविद्यालियन विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.आभार राहुल बोरसे यांनी मानले.