शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महिला सदस्यांचा ‘होऊ दे खर्च...

By admin | Updated: August 6, 2014 02:02 IST

महिला सदस्यांचा ‘होऊ दे खर्च...

’नाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांची मुदत संपण्यास अवघे आठ दिवस शिल्लक असताना, त्यांचा उत्साह वधारला आणि गेले तीन दिवस हे सदस्य गुजरात दौऱ्यावर गेले आहेत. कारकीर्द संपताना केलेल्या या दौऱ्याचे नेमके फलित काय होणार? - खर्चापलीकडे काहीच नाही, अशी प्रतिक्रिया उमटली आहे.महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीत नऊ सदस्य असून, सभापतिपदी भाजपाच्या सविता दलवाणी आहेत. वर्षभर या समितीची हालचाल कधीही जाणवली नाही. आता या समितीची मुदत संपणार असून, महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी येत्या सोमवारी (दि. ११) समितीच्या नऊ सदस्यांच्या नियुक्तीसाठी विशेष महासभा बोलावली आहे. असे असताना समितीच्या नऊपैकी सात सदस्यांनी गुजरात वारी काढली आहे. गेल्या रविवारी हे सदस्य रवाना झाले असून, सुरत, बडोदा, अहमदाबाद या महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या कामकाजाची पाहणी करून धडे घेणार आहेत. या सात सदस्यांबरोबरच जनसंपर्क अधिकारी आणि एक लिपिकही सहभागी झाला आहे.अभ्यास दौऱ्याविषयी कोणाचा विरोध नसतो; परंतु गेल्याच आठवड्यात अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नाशिक शहराजवळच गिरणारे येथे सर्व नगरसेवकांसाठंी दोन दिवसांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी या सदस्यांनीच नव्हे, तर कोणीही उत्साह दाखविला नव्हता. केवळ तीन नगरसेवक पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशीचा विचार केला तर १२७ पैकी अवघ्या १२ नगरसेवकांनी हजेरी लावली होती. आणि आता कारकीर्द संपताना हा दौरा झाला आहे. तीन दिवसांच्या दौऱ्यावर सुमारे दोन लाख रुपये खर्च होईल असा अंदाज उपआयुक्त दत्तात्रेय गोतीसे यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)