शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

शहरात महिला, पुरूषांच्या गळ्यांना चोरटे देतायेत हिसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 14:59 IST

व्हीव्हीआयपी व्यक्तींचे दौरे असल्यास शहरातील सर्व पोलीस यंत्रणा सतर्क होते. रस्त्यांवर प्रत्येक चौकात पोलीस नजरेस पडतात, तरीदेखील चोरट्यांकडून सोनसाखळी हिसकावण्याचे जबरी चोरीचे प्रकार घडत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देज्येष्ठ महिलाच नव्हे तर ज्येष्ठ पुरूषांनाही ‘टार्गेट’ गोपनीय ‘नेटवर्क’ कोलमडले

नाशिक : शहर व परिसरात विविध पोलीस ठाणेनिहाय सुरू असलेली गस्त फोल ठरू लागली आहे. सातत्याने पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळ्या हिसकावून चोरटे पोबारा करू लागल्यामुळे महिलावर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मागील दोन दिवसांत इंदिरानगर, म्हसरूळ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील घटना मिळून चार सोनसाखळ्या चोरीला गेल्या. चोरट्यांकडून केवळ ज्येष्ठ महिलाच नव्हे तर ज्येष्ठ पुरूषांनाही ‘टार्गेट’ केले जात आहे. सर्वाधिक घटना इंदिरानगर, मुंबईनाका, म्हसरूळ या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडत आहेत.

दहा ते बारा दिवसांपुर्वीच म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत संघवी नक्षत्र इमारतीजवळ चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावून पळ काढल्याची घटना घडली होती. या घटनेचा तपास सुरू होत नाही, तोच पुन्हा चोरट्यांनी म्हसरूळ पोलिसांना आव्हान देत गुरूवारी सकाळी आणि रात्रीच्या सुमारास दोन सोनसाखळ्या पुन्हा लांबविल्या. त्याच पध्दतीने चोरट्यांनी इंदिरानगर भागात लागोपाठ दोन दिवसात दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या सायंकाळी हिसकावून पळ काढला. काही दिवसांपुर्वी मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीतदेखील अशाच पध्दतीने सोनसाखळी चोरीची घटना घडली होती. सर्वाधिक घटना इंदिरानगर पोलीस ठाण्यात अद्याप घडल्या आहेत. मुख्यमंत्री मागील महिन्यात दौऱ्यावर असताना चोरट्यांनी इंदिरानगर, मुंबईनाका पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळ्या लंपास केल्या होत्या. गुरूवारी राष्टÑपती नाशिक दौºयावर आले असतानाही चोरट्यांनी सोनसाखळ्या म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरल्या. व्हीव्हीआयपी व्यक्तींचे दौरे असल्यास शहरातील सर्व पोलीस यंत्रणा सतर्क होते. रस्त्यांवर प्रत्येक चौकात पोलीस नजरेस पडतात, तरीदेखील चोरट्यांकडून सोनसाखळी हिसकावण्याचे जबरी चोरीचे प्रकार घडत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.चौघांना महिनाभरापुर्वीच बेड्यामागील महिन्यात गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाने संघटितपणे जबरी चोरीचे गुन्हे वारंवार करणाºया चौघांच्या टोळीला बेड्या ठोकल्या होत्या. या चोरट्यांकडून विविध पोलीस ठाणे हद्दीतील सुमारे दहा गुन्हे उघडकीस आले. त्यांच्याकडून सुमारे २३ तोळे सोन्यासह दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या होत्या.गोपनीय ‘नेटवर्क’ कोलमडलेप्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये स्थानिक गुन्हे शोध पथक कार्यान्वित आहे;मात्र या पथकांचे गोपनीय ‘नेटवर्क’ कोलमडले की काय, अशी शंका येते. सोनसाखळी चोरी असो किंवा घरफोडीसारखे गुन्हे असो या गुन्ह्यांची उकल स्थानिक गुन्हे शोध पथकांना करण्यास अपयश येत असल्याचे मागील काही महिन्यांपासून दिसून येत आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRobberyचोरीChain Snatchingसोनसाखळी चोरी