शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक आरोग्यासाठी कार्यरत महिला-मुले सहाय्यता कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:50 IST

टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स, सर्वोच्च न्यायालय आणि महाराष्टÑ पोलीस यांच्या वतीने महिला व लहान मुलांसाठी कल्याणकारी संस्था म्हणून महिला व मुले सहाय्यता कक्ष महाराष्टÑात गेल्या ३० वर्षांपासून कार्यरत आहे. या संस्थेअंतर्गत नाशिकमध्ये ८ मार्च २००३ साली नाशिकसाठी महिला सहाय्यता कक्षाच्या कामास प्रारंभ झाला. आजवर या संस्थेकडे कौटुंबिक हिंसाचार, महिलांवरील अत्याचार, घटस्फोट खटले, लहान मुलांवरील अत्याचार, मानसिक ताणतणावाच्या घटना आदी विविध प्रकारच्या केसेस आले होते व त्यांचे निराकरण करून त्यांना निरनिराळ्या स्तरावर मार्गदर्शन करण्यात आले.

परिचय महिला संस्थांचाटाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स, सर्वोच्च न्यायालय आणि महाराष्टÑ पोलीस यांच्या वतीने महिला व लहान मुलांसाठी कल्याणकारी संस्था म्हणून महिला व मुले सहाय्यता कक्ष महाराष्टÑात गेल्या ३० वर्षांपासून कार्यरत आहे. या संस्थेअंतर्गत नाशिकमध्ये ८ मार्च २००३ साली नाशिकसाठी महिला सहाय्यता कक्षाच्या कामास प्रारंभ झाला. आजवर या संस्थेकडे कौटुंबिक हिंसाचार, महिलांवरील अत्याचार, घटस्फोट खटले, लहान मुलांवरील अत्याचार, मानसिक ताणतणावाच्या घटना आदी विविध प्रकारच्या केसेस आले होते व त्यांचे निराकरण करून त्यांना निरनिराळ्या स्तरावर मार्गदर्शन करण्यात आले.  महिलांचा वावर ज्या ज्या क्षेत्रात आहे, त्या सर्व ठिकाणी महिलांना निर्भयपणे कामकाज करता यावे यासाठी आवश्यक गोष्टी (समुपदेशन, मार्गदर्शन, कायदेशीर बाबी) या संस्थेतर्फे केल्या जातात. या संस्थेतर्फे विवाहपूर्व, विवाहपश्चात सुमपदेशन, लिव्ह इन जोडप्यांच्या समस्या, कौटुंबिक कलह आदी समस्यांवर समुपदेशन केले जाते. अशा घटनांमुळे असहाय्य झालेल्या महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न या संस्थेतर्फे केला जातो. त्यांना नोकरी, व्यवसाय शोधण्यास मदत केली जाते.पूर्वी चूल आणि मूल या चौकटीतच असणारी महिला आता शिकून नोकरी-व्यवसायासाठी घराबाहेर पडू लागली आहे. पण असे असूनही घरच्या जबाबदाºयांचा भारही तिच्यावरच येतो. त्यातून कौटुंबिक कलह तयार होतात. अशा केसेसमध्ये पत्नी-पत्नीबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांनाही समोरासमोर बसवून मार्गदर्शन केले जाते. त्यांचे समुपदेशन केले जाते. संस्थेतर्फे महिला जनजागृतीच्या निरनिराळ्या कार्यशाळा घेतल्या जातात. याशिवाय उशिरा लग्न्न केल्यामुळे येणाºया अडचणी, लिव्ह इनमधील फसवणूकीच्या केसेसही मोठ्या प्रमाणात कक्षाकडे येत आहेत. त्यांनाही मार्गदर्शन करण्याचे काम सुरू असते. संस्थेचे कार्यकर्ते ठिकठिकाणी जाऊन कार्यशाळांमध्ये मार्गदर्शनही करतात. सध्या महिला सहाय्यता कक्षात कविता निकम, गीता गायकवाड, दीपाली मानकर आदी कार्यरत आहेत.