शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

ओझर येथील महिलेला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:10 IST

पोलिसांत तक्रार : पावणेदोन लाखांची ‘फिल्मीस्टाइल’ फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कओझर : येथील उपनगरांमध्ये ब्यूटिपार्लर चालविणाऱ्या महिलेला लंडनमधील युवकाने तब्बल पावणेदोन लाखांना गंडा घातला आहे.पतीशी मतभेद होत असल्याने सध्या आपल्या आईवडिलांकडे राहणार्या या महिलेने लग्नासाठी एका आॅनलाइन विवाहसंस्थेच्या संकेतस्थळावर प्रोफाइल लोड केले. तरुणी वरांची माहिती बघत असताना लंडन येथील मिचल ससोन क्र ेग नामक इसमाने मोबाइलवरून महिलेला फोन करत व्हाट्सअ‍ॅपने संवाद साधणे सुरू केले. बोलणे सुरु झाल्यावर मिचेलने त्याची पत्नी मयत झाली असून, मला सारा नावाची पाच वर्षांची मुलगी असल्याचे सांगितले. मी लंडन येथेच स्थायिक आहे असे सांगून त्याने कंपनीत उच्च पदावर असल्याचे सांगितले. काही दिवसांनी मी व आई दोघे तुला भेटायला ओझर येथे येणार असून घराचा पत्ता विचारला. या महिलेने पत्ता दिल्यानंतर त्याने कुरिअरद्वारे भेटवस्तू पाठवल्याचे सांगितले.दोन दिवसांनी दिल्ली येथून डेल्टा कुरिअर सर्व्हिसमधून श्वेता नावाच्या मुलीचा फोन आला. तिने पार्सल सोडवण्यासाठी ४२५०० रक्कम बँक खात्यावर भरावी लागेल असे सांगितले. महिलेने रक्कम बँकेत टाकल्यानंतर श्वेताने पार्सल सोडवण्यासाठी १ लाख २५ हजार रु पये भरून पार्सल सोडून घ्या असे उत्तरे देऊन वेळ मारून नेली. सदर महिलेने पुन्हा पैसे जमा करत श्वेताशी संपर्क झाल्यानंतर तिने सदर चलन भारतात चालणार नसून ते विमानतळ येथेच बदलावे लागेल असे सांगून पुन्हा ७५ हजारांची मागणी केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलीस स्टेशनकडे धाव घेत आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार केली. तब्बल १ लाख ६७ हजार ५०० रूपयांची फसवणूक केलेल्या अज्ञात बंटीबबलीचा शोध पोलीस घेत असून, या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट करत आहे.झालेली फसवणूक लक्षात घेता भविष्यात असे प्रकार होऊ नये म्हणून सतर्क राहावे. तोंडी विश्वास ठेवण्यापेक्षा खोलवर माहिती घेऊन निर्णय घ्यावा. अनेक जण सोप्या मार्गाने पैसे कमवण्यासाठी खोटी माहिती देऊन व भुरळ टाकून फसवणूक करतात, अशापासून सावधान असायला हवे. - श्रीहरी बहिरट, पोलीस निरीक्षक, ओझर