शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कार अडवून महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:13 IST

----- शहरात दोघांची आत्महत्या शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये महिलेसह एका व्यक्तीने राहत्या घरात आत्महत्या केली. पहिल्या घटनेत कोमल प्रभू वाबळे ...

-----

शहरात दोघांची आत्महत्या

शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये महिलेसह एका व्यक्तीने राहत्या घरात आत्महत्या केली. पहिल्या घटनेत कोमल प्रभू वाबळे (३७, रा. माडसांगवी) या महिलेने राहत्या घरात शनिवारी (दि.६) सकाळी दहाच्या सुमारास विषारी औषध सेवन केले. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर दुसऱ्या घटनेत पांडवनगरी परिसरात राहणारे अरविंद रामदास खडताळे (४०) यांनी शनिवारी राहत्या घरात गळफास घेतल्याचे आढळून आले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

----

ब्लॅकमेल करून विवाहितेवर अत्याचार

नाशिक : विवाहिता महिलेचे व्हिडीओ, फोटो तिच्या पतीला दाखविण्याची धमकी देत ब्लॅकमेल करून संशयित आरोपी नवीन सुनील गायकवाड (२५, रा. बेथेलनगर, शरणपूर रोड) याने पीडित विवाहितेवर शारीरिक अत्याचार करत २०१८ सालापासून तिच्या घरात बळजबरीने प्रवेश करत वेळोवेळी तिच्याशी बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित करत अत्याचार केल्याची फिर्याद दिली आहे. त्यानुसार गायकवाडविरुध्द सरकारवाडा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आाला आहे. तसेच त्याचा भाऊ संदेश सुनील गायकवाड आणि वर्षा सुनील गायकवाड यांच्याविरुध्द पीडितेच्या फिर्यादीनुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संशयित दोघा भावांना अटक केली आहे.

---

शिंगाडा तलाव येथे बसवाहकाला मारहाण

नाशिक : शिंगाडा तलाव येथे एका युवकाने राज्य परिवहन महामंडळाची धावती बस रोखून बसवाहकाला शिवीगाळ करत खाली खेचत मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि.६) घडली. याप्रकरणी फिर्यादी अंकुश जामवंतराव काळे (३४, रा. ता. शिंदखेडा, जि. धुळे) यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात संशयित मोहंमद शोएब निसार शेख (२२, रा. भद्रकाली) याच्याविरुध्द तक्रार दिली आहे. यानुसार पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शेखविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी (दि.६) दुपारी तीन वाजेच्या सुमारास काळे हे बसमधून ( एमएच २० बीएल १५४६) शहाद्याहून नाशिकला येत होते. त्यावेळी शिंगाडा तलावाजवळील रस्त्यावर संशयित शोएब याने त्यांची बस अडवून अंकुश यांना खाली खेचले. तसेच गाडीला कट का मारला, अशी कुरापत काढून मारहाण करत शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी संशयितास अटक केली आहे.

---

अंडाभुर्जीच्या उधारीच्या पैशांवरून वाद घालत तिघांनी मिळून एकास मारहाण करीत दुखापत केल्याची घटना पळसे येथे घडली. याप्रकरणी शरद ऊर्फ गोरक्षनाथ ज्ञानेश्वर गायधनी (३२, रा. पळसे) यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात संशयित संतोष आनंदा गायधनी, समाधान आनंदा गायधनी व आनंदा गायधनी (तिघे रा. पळसे) यांच्याविरोधात मारहाणीची फिर्याद दाखल केली आहे. संशयितांनी शुक्रवारी (दि.५) रात्री कुरापत काढून शरदला मारहाण केली. तसेच समाधानने लोखंडी पाइपने शरदच्या डोक्यात मारहाण करीत दुखापत केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस तपास करीत आहेत.